आशाताई बच्छाव
शहरातील मठा लगत असलेल्या मांस व मच्छी विक्रेत्यांना स्थलांतरित करा
भाजपचे कौरवार यांच्या कडून मागणी
देगलूर/प्रतिनिधी गजानन शिंदे
देगलूर शहर महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगाणा या तिन्ही राज्यातील सीमेवरील भाविकांचे व तमाम हिंदु समाजाचे श्रध्दास्थान असलेले वै. गुंडा महाराज मठ संस्थान च्या परिसरात दर वर्षी दिंडी व अनेक धार्मिक उत्सव साजरे केळी जाते. मठा लगत व दिंडी मार्ग असलेल्या परिसरात विना परवाना मांस, मच्छी विक्री करणा-या व्यवसायीकामुळे या परिसरात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य झाले असून, हैद्राबाद बँक, मोंढा, एल.आय.सी. कार्यालय, मशिनरी लाईन, कृषी सेवा केंद्र, भांडी मार्केट यांच्या व्यवसायाच्या व्यवहारासाठी जाण्यासाठी हा मुख्य मार्ग आहे. तेथे उघडवावर मांस विक्री होत आहे.त्यामुळे मोकाट जनावरे व कुत्रे मासाचे अवशेष तुकडे इतरत्र फेकत आहेत. त्यामुळे दुर्गंधी व घाणीच्या साम्राज्यामुळे रहदारीस अडथळे निर्माण होत आहेत. त्याचा त्रास सर्व सामान्य नागरीकांना होत आहे. तसेच धार्मिक उत्सव व दिंडी काळात हिंदु धर्माचे धार्मीक भावना दुखावले जात आहेत. असे निवेदन मुख्याधिकारी ,उपजिल्हाधिकारी कार्यालय,पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.
मांस विक्री व्यवसाय लवकरात लवकर स्थलातरीत करुन नागरिकांना होणारा त्रास व रहदारीस मार्ग मोकळा करावा अशी मागणी दिगंबर कौरवार , सतीश जोशी ,संतोष आगलावे,राहुल पेंडकर ,विकास मोरे,साई बोनलावार ,योगेश मैलागींरे,ऋषिकेश येरगे,शुभम जुजनुरे,सुरज मामीडवार,विनायक नागशेट्टीवार,आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले