आशाताई बच्छाव
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी संविधानाचा अभ्यास करावा – ॲड महेंद्र गोस्वामी
संजीव भांबोरे
भंडारा_विधी सेवा समिती व नगर परिषद पवनी यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषदेच्या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधानातील मुलभूत अधिकार व मुलभूत कर्तव्ये या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून जेष्ठ विधीज्ञ ॲड महेंद्र गोस्वामी हे होते.
आजच्या स्पर्धेच्या युगात एमपीएससी व युपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी भारतीय राज्यघटनेचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असून मौखिक व लेखी परीक्षेत संविधानाच्या विषयावर हमखास प्रश्न विचारले जातात.त्यामुळे जर यश संपादन करायचे असेल तर भारतीय संविधानातील मुलभूत अधिकार व कर्तव्ये समजून घ्यावेत,असे आवाहन जेष्ठ विधीज्ञ ॲड महेंद्र गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
या मार्गदर्शन कार्यशाळेचे संचालन पवनी न्यायालयातील विधी सेविका कु.फाल्गुनी भुरे यांनी केले.तर आभार प्रदर्शन न.प.अभ्यासिकेतील ग्रंथपाल गजानन कोहाट यांनी केले.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी उपस्थित होते.






