Home जालना भोकरदन शहरात विजा व मेघ गर्जनेसह पाऊस . या पावसाचे छायाचित्र टिपले...

भोकरदन शहरात विजा व मेघ गर्जनेसह पाऊस . या पावसाचे छायाचित्र टिपले आहे आमचे प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे यांनी

202

आशाताई बच्छाव

1001493979.jpg

भोकरदन शहरात विजा व मेघ गर्जनेसह पाऊस . या पावसाचे छायाचित्र टिपले आहे आमचे प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे यांनी
भोकरदन युवा मराठा न्यूज नेटवर्क रिपोर्टर गजेंद्र पाटील लोखंडे
आज दुपारपासून भोकरदन शहरांमध्ये विजा व मेघगर्जनेसह पाऊस बरसत आहे दोन-तीन दिवसापासून उनाने त्रस्त असलेल्या नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे थंड गरम वातावरणामुळे सर्दी व डोके दूखी सारख्याआजारने डोकं वर काढल्याचे दिसत आहे दहा ते पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेला पावसाळा त्यामुळे शेतकऱ्यांची शेती मशागतीसाठी लगबग सुरू आहे त्यातच पावसाने हजेरी लावल्याने मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांची धांदल उडत आहे ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी रोपवाटिका लावलेले आहे व काही शेतकऱ्यांनी मिरची लागवड केलेली असून अशा शेतकऱ्यांना मिरची वरती व्हायरल रोग येण्याची भीती वाटत आहे . ज्या शेतकऱ्यांची पूर्व मशागतीची काम झालेली आहे अशा शेतकऱ्यांच्या मध्ये आनंद निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे शासनाने मागील त्याला विहीर या रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या विहिरीचे काम चालू असून पावसाला लवकर सुरुवात झाल्यास सुरू असलेले विहिरीचे काम अधुरी राहण्याची भीती शेतकरी वर्गात निर्माण झालेली आहे यावर्षीचा पावसाळा लवकर सुरू होण्याचा अंदाज असल्याने खरिपाच्या पेरण्या जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण होतील अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे आज पडणाऱ्या पावसामध्ये हवा विजा व मेघगर्ज नेसह पाऊस पडत आहे आकाशामध्ये ढगासह वातावरण काळे कुठे दिसत असून रात्रीच्या वेळी पाऊस येण्याची दाट शक्यता दिसून येत आहे .

Previous articleवडिलोपार्जीत शेतजमिनीच्या वाटणीवरून चतुर्भूज भावांमध्येच हाणामारी
Next articleस्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी संविधानाचा अभ्यास करावा – ॲड महेंद्र गोस्वामी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.