• Home
  • अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाइल देऊन त्यात मराठी पोषण ट्रक ऍप समाविष्ट करून द्यावे या मागणीसाठी सटाणा तालुक्यात मोर्चा

अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाइल देऊन त्यात मराठी पोषण ट्रक ऍप समाविष्ट करून द्यावे या मागणीसाठी सटाणा तालुक्यात मोर्चा

आशाताई बच्छाव

IMG-20221111-WA0068.jpg

अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाइल देऊन त्यात मराठी पोषण ट्रक ऍप समाविष्ट करून द्यावे या मागणीसाठी सटाणा तालुक्यात मोर्चा                   सटाणा,(जगदिश बधान तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ बागलाण तालुक्याच्या वतीने  पंचायत समिती बागलाण ते बालविकास प्रकल्प कार्यालय सटाणा येथे तालुका अध्यक्ष कुसुम खैरनार-गांगुर्डे, लता देवरे,शालिनी सवकार यांच्या नेतृत्वाखाली भव्य धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिवसेने चे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे यांनी अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांबाबत पाठिंबा देऊन अल्प मानधनात जास्त काम करून घेतले जाते,त्यामुळे त्यांचे कामकाज सुटसुटीत करण्यासाठी नवीन मोबाईल देण्यात यावेत या मागणी साठी पालकमंत्र्यांना भेटून प्रश्न मांडू असे अश्वसित केले.यावेळी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष वैभव गांगुर्डे व शहर अध्यक्ष यशवंत कात्रे ,दगाजी सोनवणे, राजन चौधरी,यांनी मनोगत व्यक्त करून मोर्चा ला पाठिंबा दिला.बालविकास प्रकल्प कार्यालयाचे विस्तार अधिकारी सचीन अहिरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले
यावेळी संघटनेच्या तालुका अध्यक्ष कुसुम खैरनार-गांगुर्डे, लता देवरे, मनीषा कापडणीस, रुपाली खरे, जिजा जाधव, प्रतिभा सावंत, शालिनी सावकार, इंदू बोरसे, अंजना गांगुर्डे, लता पाटील, भिकू दुसाने, ललिता सोनवणे, यशोदा पवार, छाया उशिरे, उषा पगार, विजया धोंडगे, स्मिता धोंडगे, ज्योती आहिरे, संध्या आहिरे.प्रमिला गांगुर्डे,आदीसह शेकडो सेविका मदतनीस उपस्थित होत्या,

anews Banner

Leave A Comment