Home अमरावती लाखोच्या दुचाकीची आठ ते दहा हजारात विक्री, गुन्हे शाखेच्या युनिट ची महत्त्वाची...

लाखोच्या दुचाकीची आठ ते दहा हजारात विक्री, गुन्हे शाखेच्या युनिट ची महत्त्वाची कारवाई.

89
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230914-203014_WhatsApp.jpg

लाखोच्या दुचाकीची आठ ते दहा हजारात विक्री, गुन्हे शाखेच्या युनिट ची महत्त्वाची कारवाई.
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा
पी एन देशमुख .
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
शहर तथा नागपूर येथून दुचाकी चोरून त्या दुचाकीच्या अल्प दरात विक्री करणाऱ्या एका सराईत चोराला गुन्हे शाखेच्या युनिटने 13 सप्टेंबर रोजी अटक केली. त्यांच्याकडून तब्बल १७ तू चाकी जप्त करण्यात आल्या त्याचा एक साथीदार फरार आहे मोहम्मद अल्तमश उर्फ अंतू मोहम्मद इकबाल वय 20 बिस्मिल्ला नगर अमरावती असे अटक करण्यात आलेल्या चे तर अब्दुल तहसीर अमरावती असे अटक करण्यात आलेल्यांचे तर तहसीन अब्दुल फाईन उर्फ अश्फांन राहणार बिस्मिल्ला नगर अमरावती असे फरार चोरांचे नाव आहे. आलतू नामक तरुण बिस्मिल्ला नगर भागात ८ते१० हजार रुपयात जुन्या दुचाकी विक्री करीत असून त्याच्याजवळ कोणते कागदपत्र नसण्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिटला माहिती मिळाली त्या आधारे त्याला पठाण चौक येथून ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशी त्याने साथीदाराला अब्दुल तहसीन उर्फ असफान यांच्यासोबत अमरावती शहर व नागपूर येथून एक ते दीड महिन्यात अनेक दुचाकी चोरण्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्याकडून एकूण १७ दुचाकी जप्त करण्यात आल्यात. त्याच्याकडून राजापेठ फेदरपुरा व कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील १० व नागपूर शहरातील सतरा येथील १ अशा ११ दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिटचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे व इतर सोबत असलेले पोलीस टीम अमरावती यांनीही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here