Home बुलढाणा वानखेड येथे चांडक परिवाराच्या आदर्श उपक्रमाचे आ.डॉ संजय कुटे यांच्या हस्ते थाटात...

वानखेड येथे चांडक परिवाराच्या आदर्श उपक्रमाचे आ.डॉ संजय कुटे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20221023-WA0056.jpg

वानखेड येथे चांडक परिवाराच्या आदर्श उपक्रमाचे आ.डॉ संजय कुटे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलढाणा

आज वानखेड येथे स्व कमलादेवी सुगदेवजी चांडक वैल्फेयर सोसायटी द्वारा आयोजित डॉ कलाम फिरती प्रयोगशाळेचे उदघाटन आ.तथा माजी मंत्री डॉ संजयजी कुटे यांच्या हस्ते पार पडले

वानखेड येथील अनेक समाज भूषण व्यक्ती पैकी एक व्यक्ती म्हणजे डॉ नारायण रत्नलालजी चांडक.चांडक आणि गांधी परिवाराला सुरुवाती पासूनच समाजासाठी काही ना काही वेगळे करण्याची जिद्द.आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गांधी परीवार सुद्धा त्यांच्या दिमतीला आला.गांधी परिवाराने स्व.डॉ रामेश्वर गांधी यांच्या रूपाने रुग्ण सेवेतून समाज सेवा केली.गांधी परीवराचेच जावई पी एच डी प्राप्त डॉ नारायण रतनलालजी चांडक हे वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारे निसर्ग प्रेमी व्यक्तिमत्त्व आहेत. आपल्या तालुक्यातील 1ते 10 वी पर्यांतच्या विद्यार्थ्यांना विज्ञान या विषयाची गोडी लागावी आणि त्यांचा कल विज्ञानाकडे वाढवा म्हणून डॉ ए पी जे अब्दुल कलाम ही फिरती प्रयोग शाळा काढून तालुक्यातील नव्हे तर पूर्ण मतदार संघातील शाळा मध्ये जावून विद्यार्थ्यांना नवं नवीन प्रयोग करून दाखवावे.त्यासाठी त्यांनी एक वाहन खरेदी केले,त्यावर दोन शिक्षक नियुक्त केले.आणि अशाप्रकारे त्यांनी विचाराधीन असलेल्या संकल्पनेचे आज आपले लाडके आणि लोकप्रिय आमदार तथा माजी मंत्री डॉ संजय जी कुटे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन केले.
डॉ कलाम फिरती प्रयोगशाळे विषयी प्रस्ताविक संस्थेचे सचीव डॉ. नारायण चांडक यांनी केले तर डॉ आमदार कुटे यांनी या फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचे तोंडभरून कौतुक केले यावेळी ते म्हणाले चांडक परिवाराने जो हा उपक्रम राबविला आहे तो समाजासाठी प्रेरणादायी आणि स्तुत्य आहे. या अभिमानास्पद उपक्रमाला राष्ट्रपती डॉ कलाम यांचे नाव दिल्याबद्दलही त्यांनी चांडक आणि गांधी परिवाराचे अभिनंदन केल.चांडक आणि गांधी परिवारातील दोन चिमुकल्या मुलींनी पिण्याच्या पाण्याचा जो प्रयोग करून दाखविला त्याबद्दल त्या मुलींची भर भरून प्रशंसा केली आणि आर ओ च्या पाण्यापेक्षाही 140 गाव योजनेचे पाणी पिण्यास कसे योग्य आहे हे मुलींनी करून दाखविलेल्या प्रयोगातून समजावून सांगितले.

या कार्यक्रमाचे सुत्र संचालन आदरनीय प्रकाश नागोलकर सर यांनी आपल्या सूमधुर आवाजात केले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्रीमती मंगला ताई रांगभाल यांनी भूषविले.तर प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद सदस्य ज्ञानदेवराव भारसाकळे उपसरपंच राजेश पाखरे,सत्यनारायण चांडक,विशाल चांडक,गणेश गांधी,राजु बाप्पु देशमुख,शैलेश गांधी मनीष गांधी,दुर्गदैत्य येथील सरपंच अमर तायडे व परिवारातील सर्व गणमान्य व्यक्ती हजर होते.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली वानखेड गाव ची सुन व वानखेड गाव ची लेक डॉ कलाम प्रयोगशाळेच्या अध्यक्षा अँड. सौ. जोत्सना चांडक गांधी यांनी केले

Previous articleठाणे रेल्वे स्थानक परिसरात दररोज वाहतूक कोंडी ..! आमदार संजय केळकर यांची पाहणी
Next articleगोरगरिबांची दिवाळी गोड करता आली याचे समाधान – खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here