Home Breaking News धारावीत चित्याच्या गतीने वाढतेय रुग्णसंख्या

धारावीत चित्याच्या गतीने वाढतेय रुग्णसंख्या

121
0

धारावीत चित्याच्या गतीने वाढतेय रुग्णसंख्या 

बई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

रविवारी आणखी ४४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील बाधित रुग्णांची संख्या १२४२वर पोहोचली आहे. मात्र, धारावीतील माटुंगा लेबर कॅम्प हा हॉटस्पॉट कायमच आहे. आतापर्यंत या ठिकाणी ६०ते ६५ बाधित रुग्ण आढळून आलेले असतानाच रविवारी याठिकाणी आणखी ६ नवीन बाधित रुग्ण आढळले.

धारावीतील ९० फुटी रस्त्यांवर ४ रुग्ण कल्याणवाडीत दिवसभरात तीन कुंचिकुरवे नगर, जस्मिन मिल रोड, कुंभारवाडा, ट्रान्झिट कॅम्प आदी ठिकाणी प्रत्येकी २ रुग्ण आढळले. याशिवाय फातिमा बाई चाळ, वैभव अपार्टमेंट, शास्त्री नगर, विजय नगर, न्यू पारशी चाळ, शिवशक्ती नगर, उदय सोसायटी, गुलमोहर चाळ, लाल चाळ, शशिनाम बिल्डींग, ट्रान्झिट कॅम्प, शाहू नगर, सचिनाम बिल्डीग, ढोरवाडा, गांधीनगर सोसायटी, पद्मशाली सोसायटी, संत कंकय्या मार्ग, राजाबाली चाळ, गजानन चाळ, गजानन कॉलनी, साकीनाबाई चाळ, ६० फुटी रोड, महात्मा गांधी नगर आदी ठिकाणी ४४ नवीन रुग्ण आढळले. तीन जणांचे मृत्यू झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत धारावीतील एकूण रुग्णांची संख्या १२४२ एवढी झाली असून यामध्ये ५६ जणांचा मृत्यूचा सामावेश आहे.

दादर-माहिमध्ये दिवसभरात ११ रुग्ण

माहिम परिसरात दिवसभरात ६ रुग्ण आढळून आला असून यामध्ये अमिरानी मॅन्शन, मनमाला टँक रोड, माहिम कॉज वेसह न्यू पोलीस वसाहतीतील दोघांचा समावेश आहे. त्यामुळे माहिममधील एकूण रुग्णांची संख्या १९३वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दादरमध्ये दिवसभरात ५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. शिवशक्ती कॉम्पलेक्समधील दोन रुग्णांसह गणेश कृपा महल, राऊतवाडी, मारवाडी चाळ आदींचा समावेश आहे. त्यामुळे दादरमधील रुग्णांची एकूण संख्या १५९ वर पोहोचली असून दादरमध्ये आतापर्यंत ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here