Home सामाजिक मोबाईलधारकांनो सावधान! आपणांवर येऊ शकते मोठ्ठे संकट..!!

मोबाईलधारकांनो सावधान! आपणांवर येऊ शकते मोठ्ठे संकट..!!

76
0

राजेंद्र पाटील राऊत

20221017_225449-BlendCollage.jpg

मोबाईलधारकांनो सावधान! आपणांवर येऊ शकते मोठ्ठे संकट..!!
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)
मोबाईल हे चार अक्षराचं खेळणं.मोबाईल चांगला तसाच आयुष्याचा सत्यानाश करणारा देखील आहे,असे म्हटले तर अतिशयोक्तीचे ठरु नये.विज्ञानयुगाने बहाल केलेले हे यांत्रिक खेळणे विज्ञानाची एक मोठी क्रांती असली तरी या क्रांतीमुळे मात्र दुनिया पार वेडी होण्याची वेळ येऊन ठेपली आहे.मोबाईल जसा चांगला आहे अगदी तसाच घरेच्या घरे बरबाद करणारा सुध्दा आहे.या मोबाईलमुळे आँनलाईन फसवणूकीचे धंदे मोठया प्रमाणात वाढले.अमूक एक लिंक ओपन करा,तमूक माहिती द्या वगैरेच्या नावाखाली या आभासी दुनियेत ना ओळखीचे ना पाळखीचे मात्र आपले बँक खाते साफ करण्यात माहिर असलेले आता या मोबाईलमुळे एक वेगळीच डोकेदुखी व समस्या बनत चालले आहेत.वास्तविक आजकालची युवा पिढी छानछोकीपणाचे जीवन जगण्यासाठी घरात एक वेळा खायला मिळाले नाही तरी चालेल पण मोबाईल सारख्या चैनीच्या वस्तू निश्चितच जवळ बाळगतो.मात्र त्याचे दुष्परिणाम काय आहेत याचे भान मात्र नेमके कुणीही ठेवताना दिसून येत नाही.शासनाने सायबर क्राँईम सेल नावाचे एक खाते निर्माण केलेले असून,परंतु म्हणावे तसे या विभागाचे कामकाज देखील प्रभावशाली दिसून येत नाही.मोबाईलव्दारे आँनलाईन पध्दतीने झालेली फसवणूक म्हणजे हातचे सोडून पळत्यामागे धावणे त्यामुळेच फसवणूक करणाऱ्या भामटयांचे फावत चालले आहे. “आँनलाईन रंडीबाजीच्या नावाखाली ब्लँकमेलिंगचे वाढते प्रकार!” तस बघितलं तर मोबाईलवर इंटरनेट,इस्टाग्राम,फेसबुक,यु-टुयूब सारखे अँप अगदी कमी खर्चात दोन दोन तीन तीन महिने इंटरनेट वापरायला देणाऱ्या मोबाईल कंपन्या त्यामुळे या फसवणूक करणाऱ्या भामटयांचे चांगलेच फावले आहे.आणि आता तर कुठल्याही व्यक्तीचा मोबाईल नंबर कुठून तरी मिळवायचा आणि त्याला व्हाँटसअप फेसबुकच्या माध्यमातून जाळ्यात ओढायचे सुरुवातीला त्याचेशी ओळख वाढवायची नंतर या ओळखीच्या माध्यमातून आँनलाईन रंडीबाजीला सुरुवात करायची.व्हिडीओ काँलिंगव्दारे अश्शील चाळे करायचे.अक्षरशः कपडे उतरुन समोरच्या व्यक्तीसोबत व्हिडीओ काँलव्दारे आँनलाईन सेक्ससाठी प्रोत्साहित करायचे एकदा का अशी एखादी मुर्ख व्यक्ती जाळ्यात सापडली की मग या अशा आँनलाईन रंडीबाजी करणाऱ्या भामटयाकडून सुरु होते ब्लँकमेलिंग यु-टुयुबवर,इस्टाग्रामवर,फेसबुकवर,इंटरनेटवर अश्शील व्हिडीओ अपलोड करण्याची धमकी देऊन सुरु होतो लाखो रुपये लुटमारीचा धंदा.आणि हे सगळे अगदी बिनबोभाट सुरु आहे.त्यावर ना शासनाचा अंकूश आहे.ना सायबर क्राँईमचा कुठला काही धाक आहे.खर तर असे काँल ,व्हिडीओ प्रसारीत व्हायलाच नको त्यावर कायद्याने बंदीच यायला हवी.तरच आमची युवा पिढी बरबाद होण्यापासून वाचेल.अन्यथा या मोबाईलमुळे सत्यानाश होण्यास पुरेसा वेळ लागणार नाही.आमच्याच आयुष्याची माती करणारे यंत्र आम्ही घरापर्यत घेऊन आलेलो आहोत.मग आमचा खेळ होण्यास वेळ तरी कितीसा लागणार? “असा झाला आँनलाईन रंडीबाजीचा उलगडा” काल सायंकाळी “युवा मराठा” न्युजच्या कार्यालयीन नंबरवर ज्योती यादव नामक तरुणीचा व्हाँटसअपवर मँसेज आला.आणि आपण काय काम करता वगैरे हे विचारण्याचे सारखे सुरुच होते,ज्या व्यक्तीला आपण कधी बघितले नाही किंवा ओळखतही नाही.आणि त्या व्यक्तीला काय गरज पडली की,आपण काय काम करतो ते विचारण्याची.आणि अशाच पध्दतीने या मायाजालात आपण गुरफटत जाऊन या आँनलाईन रंडीचा धंदा करणाऱ्या छिनाल बायांच्या जाळ्यात एकदा का आपण अडकलो की,मग बाहेर पडणे खुपच कठीण…त्यामुळे मोबाईलधारकांनो सावधान!बहुतेक आपणही सापडाल संकटात.युवा मराठा जनहितार्थ सामाजिक दृष्टिकोन ठेऊन आपणांस आवाहन करीत आहे की,अशा या फसव्या व ब्लँकमेलिंगसारख्या घटनापासून दुर रहा…व शासनाने देखील या अशा फालतुगिरीच्या नावाखाली सुरु असलेल्या अनैतिक धंद्याना कायमचा चाप लावावा.अन्यथा भविष्यात आमची युवा पिढी फक्त मोबाईलमुळेच बरबाद झाल्याचे बघणे आमच्या नशिबी आल्याशिवाय राहणार नाही.एव्हढे मात्र निश्चित!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here