Home नांदेड महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी प्रोत्साहनपर अनुदानाच्या पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी...

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी प्रोत्साहनपर अनुदानाच्या पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर

130

आशाताई बच्छाव

Screenshot_20220603-192246_Facebook-removebg-preview-1.png

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी प्रोत्साहनपर अनुदानाच्या पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर

▪️उर्वरीत पात्र शेतकऱ्यांची यादी लवकरच होणार प्राप्त
▪️आधार प्रमाणिकरण करण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आवाहन
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका)  :– महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यातील सुमारे 59 हजार 413 शेतकऱ्यांची माहिती शासनास ऑनलाईन पाठविण्यात आली. यापैकी पहिल्या टप्प्यात योजनेसाठी मुदती कर्ज परतफेड करणाऱ्या 8 हजार 889 शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठविण्यात आला आहे. सर्व संबंधित पात्र शेतकऱ्यांनी प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र, ई-सेवा केंद्र अथवा संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणिकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

इतर पात्र शेतकऱ्यांचा विशिष्ट क्रमांकासह याद्या येत्या काही दिवसात प्राप्त होणार आहेत. ही प्रक्रिया संपूर्ण संगणिकृत असल्याने पात्र शेतकऱ्यांनी गोंधळून न जाता आपल्या मोबाईलवर विशिष्ट क्रमांक प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँक, आपले सेवा केंद्र येथे जाऊन आधार प्रमाणिकरण करून घेण्याची प्रक्रिया पार पाडावी, असेही जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous articleमौजे वसूर येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन.
Next articleमोबाईलधारकांनो सावधान! आपणांवर येऊ शकते मोठ्ठे संकट..!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.