Home नांदेड मौजे वसूर येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन.

मौजे वसूर येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन.

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20221016-WA0042.jpg

मौजे वसूर येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड – मौजे वसूर येथे पत्रकार संघ बाराहाळी व दत्ता पाटील मित्र मंडळ वसूर यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य मोफत आरोग्य शिबिर व दिव्या ऑप्टिकल मुखेड यांच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाची प्रमुख उद्घाटक कार्यसम्राट आमदार डॉ. तुषार राठोड साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी कार्यक्रमास विशेष उपस्थिती डॉ. स्वप्नील आढाव पाटील (निर्मल हॉस्पिटल नांदेड) डॉ. धनगे साहेब (वैद्यकीय अधिकारी पी एस सी राजुरा) डॉ. अवधूत मोरे ,डॉ.आनंद जाधव. डॉ. रोहिणी जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक दत्ता पाटील जाधव , व्यंकटराव पाटील जाधव (भाजपा तालुका सरचिटणीस) सरपंच रमेश पा.शिंदे विलास पाटील शिंदे, आत्माराम जाधव, शिवाजी पाटील शिंदे, गंगाधर पाटील शिंदे (चेअरमन) आदी उपस्थित होते.
परिसरातील गरजू व्यक्तींनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here