Home पुणे पिंपळे गुरव येथील शामभाऊ जगताप यांना ‘समाज रत्न पुरस्कार’ प्रदान

पिंपळे गुरव येथील शामभाऊ जगताप यांना ‘समाज रत्न पुरस्कार’ प्रदान

54
0

आशाताई बच्छाव

IMG-20221007-WA0026.jpg

पिंपळे गुरव येथील शामभाऊ जगताप यांना ‘समाज रत्न पुरस्कार’ प्रदान

पिंपळे गुरव,(प्रतिनिधी उमेश पाटील)- : पिंपरी चिंचवड कलाकार
संघाच्या वतीने बारावा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे शुक्रवार (दि. ७) या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजे भोसले, सिने अभिनेत्री सुरेखा कुडची, आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या सौभाग्यवती सुरेखा दिलीप आण्णा मोहिते पाटील, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, अभिनेते प्रसिद्ध उद्योजक संतोष चव्हाण, अभिनेते, दौलतराव जाधव, पिंपरी चिंचवड कलाकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार उलपे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पिंपळे गुरव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष युवानेते शामभाऊ जगताप यांचा ‘समाज रत्न पुरस्कार’ देऊन यावेळी गौरव करण्यात आला. हा पुरस्कार पिं. चिं. कलाकार संघाच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी शामभाऊ जगताप म्हणाले पिंपरी चिंचवड कलाकार संघाच्या वतीने मला समाजरत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल मी पिंपरी चिंचवड शहर कलाकार संघाचा मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच संघाच्या १२ व्या वर्धापन दिनास मी शामभाऊ जगताप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने शुभेच्छा देतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here