Home नांदेड आनंदमय भक्तीमय वातावरणात रिमझीम पावसात बाप्पा चे विसर्जन

आनंदमय भक्तीमय वातावरणात रिमझीम पावसात बाप्पा चे विसर्जन

43
0

आशाताई बच्छाव

IMG-20220911-WA0028.jpg

आनंदमय भक्तीमय वातावरणात रिमझीम पावसात बाप्पा चे विसर्जन
मुखेड प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे
मुक्रमाबाद शहरात एकूण 21 गणेश मूर्तीचे स्थापन करण्यात आले होते अकराव्या दिवसाचे गणपती अनंत चतुर्दशी रोजी संध्याकाळी 11 पर्यंत विसर्जन करण्यात आले आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा म्हणत बापाने शेतकऱ्यांना दिलासा दिला रिमझिम पावसात बापांचे विसर्जन करण्यात आले मुक्रमाबाद वाशी यांनी अगदी आनंदमय भक्तिमय वातावरणात गणपतीचे विसर्जन केले भवानी चौकात गणपती मंदिर जवळ प्रत्येक गणेश मंडळांना वीस मिनिटांचा वेळ दिला प्रत्येक गणेश मंडळांनी आप आपले सुदंर असे देखावे साजरी करण्यात आले. कै.स्व. शिवराज आप्पा आडेप्पा आवडके यांच्या स्मरणार्थ आप्पा प्रतिष्ठानच्या वतीने पारीतोषीक ठेवण्यात आले होते .यात मुक्रमाबाद येथील शंकर नगर गल्लीतील गणेश मंडळांनी प्रथम व द्वितीय पारितोषिक सोमेश्वर काॅलनी येथील ईच्छापुर्ती गणेश मंडळांनी पटकावली तर मुक्रमाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते मा सुभाष अप्पा बोधने यांच्या बसवेश्वर गणेश मंडळांनी त्रतीय पारीतोषीक पटकावली व प्रत्येक गणेश मंडळांच्या अध्क्ष्यानां अप्पा प्रतीष्ठाण च्या वतीने अध्यक्ष युवा नेते दिनेश आप्पा शिवराज आप्पा आवडके व साह्यक पोलीस निरीक्षक श्री संग्राम जाधव साहेब यांच्या हस्ते बक्षीस व सन्मान चिन्ह देउन त्याचां सत्कार करण्यात आला.शिवा संघटनेचे जिल्हा संघटक तथा गणपती मंदिर चे अध्यक्ष बालाजी अप्पा पसरगे, शिवसेनेचे शहरप्रमुख सदानंद घाळे,अप्पा प्रतीष्ठाण चे सचीव सुरज उमाकांत खळुरे, राष्ट्रवादी चे उपतालुकाप्रमुख मगदुम पठाण व डाॅ.अनील पंदिंलवार, डॉ.रेड्डि, चंद्रकांत दासरवार यांनी त्यांना सुभेच्छा दिल्या.व अंत्यंत महत्वाची कामगिरी मुक्रमाबाद ग्रामपंचायत चे सरपंच सौ.अंजीता ताई बालाजी बोधने व उपसरपंच सदाशिव बोयेवार यांनी वीसर्जन साठी चांगल्या प्रकारे नियोजन केले होते व गणेश मंडळांनी त्यांचे आभार व्यक्त केले.तसेच पोलीस स्टेशन चे API संग्राम जाधव साहेब,पो.उपनीरीक्षक गोपीनाथ वाघमारे,पो.उपनीरीक्षक कांगणे,पो.उपनीरीक्षक शेख ताहेर, गोपनीय शाखेचे यादव ईबीतवार,बीट जमादार शिवाजी आडेकर, दिलीप तग्याळकर, यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
आता गावकऱ्यांचे लक्ष पोलीस स्टेशन च्या बक्षीस कडे वेधले आहे.

Previous articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांच्या केलेल्या गौरवाने आम्हा शिक्षकांना प्रेरणा
Next articleनांदगांव शहरात तीन दुकानें फोडली,।         
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here