Home रत्नागिरी गणपतराव ब्रिद माध्यमिक विद्यालय तांबडी चे मुख्याध्यापक एकनाथ राऊत सेवानिवृत्त

गणपतराव ब्रिद माध्यमिक विद्यालय तांबडी चे मुख्याध्यापक एकनाथ राऊत सेवानिवृत्त

81
0

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0048.jpg

गणपतराव ब्रिद माध्यमिक विद्यालय तांबडी चे मुख्याध्यापक एकनाथ राऊत सेवानिवृत्त                   रत्नागिरी,(सुनील धावडे)

संगमेश्वर तालुक्यातील तांबेडीसारख्या दुर्गम भागात काँग्रेसचे नेते गणपतराव ब्रिद यांनी या दशक्रोशीतील विद्यार्थी वर्गाला कडवई, संगमेश्वर सावर्डे असे दुर जावून शिक्षण घ्यावे लागत असल्याने अनेक अडचणी येत असत. ही समस्या दूर करणेसाठी गणपतरावांनी तांबेडीत चांगले व दर्जेदार विद्यादान मिळावे या हेतूने तत्कालीन खासदार व शिक्षण महर्षी कै.गोविंदराव निकम यांचे सहकार्याने माध्यमिक विद्यालययाची मुहुर्तमेढ रोवली. याच विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ सखाराम राऊत हे सेवानिवृत्त झाले.

त्यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा आज जि. प. प्राथमिक शाळा नं. २ तांबेडी गवळवाडी येथे शिक्षकवृंद व ग्रामस्थांचे उपस्थित झाला. त्यांनी अनेक वर्षे अध्ययनाचे कार्य केले. या काळात शाळेसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवून शाळेला नावारूपाला आणण्यात मोलाची कामगिरी केली. या शाळेला जिल्हा पातळीवर अनेक बक्षिसे मिळवुन दिली. विद्यार्थीप्रिय शिक्षिक म्हणून त्यांनी नावलौकीक मिळवला. या शाळेत शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून त्यांनी सेवा बजावली.

Previous articleजिल्हाधिकार्‍यांच्या “सागर दर्शन” निवासस्थानी ’श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा
Next articleगणपतीपुळे समुद्रकिनारी जयगड पोलीस ठाण्याकडून रेड झोनची निर्मिती ! सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचा निर्णय
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here