Home Breaking News भाडयाच्या इमारतीत चालत असलेल्या जि प शाळांचे समायोजन तूर्त स्थगित करू –...

भाडयाच्या इमारतीत चालत असलेल्या जि प शाळांचे समायोजन तूर्त स्थगित करू – शिक्षण सभापती मा.श्री.संजय बेळगे

233

भाडयाच्या इमारतीत चालत असलेल्या जि प शाळांचे समायोजन तूर्त स्थगित करू – शिक्षण सभापती मा.श्री.संजय बेळगे

नांदेड, दि.२६ – राजेश एन भांगे

दि. २५/९/२० रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली म.रा. शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने शिक्षण सभापती मा. श्री.संजय बेळगे, व जी.प. अध्यक्षा मा. सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले त्यात नांदेड जिल्यातील भाडयाच्या इमारतीत चालणाऱ्या जि.प.शाळांचे समायोजन इतर शाळेत करणार असे पत्र निघाले होते , त्या अनुषंगाने सदर शाळा इतर ठिकाणी समायोजन केल्यास तेथील गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची आबाळ होईल. मुले शिक्षणापासून वंचित राहतील ,शहरात इंग्रजी शाळांचे पेव खुप प्रमाणात आहे, पण मोल मजुरी करणारे, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांना परिसरातील जिल्हा परिषद शाळा हाच पर्याय आहे, कारण मुलांना ने आण करण्यासाठी पालक घरी नसतात आणि सोबतच शिक्षकाच्या समायोजनाचा ही प्रश्न निर्माण होणार आहे.

निवेदनात नमूद केल्या प्रमाणे सर्व बाबींवर मा शिक्षण सभापती साहेब यांच्या सोबत शिक्षक नेते तथा परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे सर ,संजय कोठाळे सर मराठवाडा प्रमुख यांची आणि शिष्टमंडळाची चर्चा झाली तेव्हा सभापती साहेबांनी सदर विषय तूर्त स्थगित करू असे आश्वासन दिले.

मा जि प अध्यक्ष सौ मंगारानी आंबुलगेकर यांनी ही मा शिक्षण अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून मुलाच्या हितासाठी योग्य निर्णय घेऊ असे आश्वासित केले.या शिष्टमंडळात शिक्षक नेते मधुकर उन्हाळे, सुरेश दंडवते, संजय कोठाळे, विठ्ठल ताकबिडे,डी एम पांडागळे,बालाजी पांपटवार जिल्हा, सिद्धेश्वर मठपती, गौतम कसबे,बाळासाहेब मटके, धोंडीराज मुस्तापुरे, मुंडकर सर,सुधाकर वजिरगावे या सह अनेक शिक्षक उपस्थित होते.

Previous articleसध्या सगळीकडे अतिवृष्टी ने सगळ्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे.
Next article*कौळाणे ग्रामपंचायतीचा सावळा गोंधळ;शासकीय जागावर अतिक्रमण*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.