Home Breaking News *कौळाणे ग्रामपंचायतीचा सावळा गोंधळ;शासकीय जागावर अतिक्रमण*

*कौळाणे ग्रामपंचायतीचा सावळा गोंधळ;शासकीय जागावर अतिक्रमण*

205
0

*कौळाणे ग्रामपंचायतीचा सावळा गोंधळ;शासकीय जागावर अतिक्रमण* *“गाव तस चांगलं,पण भल्याभल्यांनी नासवंल!असं म्हणण्याची वेळ कौळाणे (निं.)गावाबाबत निर्माण झालेली आहे,विविध समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या या गावाचा पंचनामा करणारा हा विशेष लेखमालिकेचा धांडोळा आजपासून वाचकांसाठी”*
मालेगांव(कार्यालय प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-नाशिकच्या मालेगांव तालुक्यात असलेल्या श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौळाणे (निं)गावाची सध्याची अवस्था अत्यंत बिकट व भयानक झालेली आहे.भविष्यात या गावात कुठलीही शासकीय योजना राबविण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नसल्याने भविष्यकाळात या गावी शासनाच्या कुठल्याही योजना राबविता येणार नाहीत हे स्प्ष्ट चित्र उभे राहिले आहे.
गावाचे तीनतेरा व नऊबारा कसे वाजतात याचे हे उदाहरण आहे.या गावाला अतिक्रमणाने पुर्णपणे वेढा दिलेला असून,आजच लोकांनी नदीजवळच्या स्मशानभुमीपर्यत अतिक्रमण केले आहे.तर काही महाभागांनी शासकीय मालमतेचे मुतारी शौचालये उध्वस्त करुन त्या जागी अवैध धंद्यासाठी घरे बांधली आहेत.मात्र या गंभीर प्रकाराची ग्रामपंचायत प्रशासनाने काहीच दखल घेतलेली नसल्यामुळे “तेरी भी चुप मेरी भी चुप”या न्यायाने सारेच दलालखोरीत अडकलेले आहेत.अतिक्रमण धारकांकडून फुकटचा हरामात रग्गड पैसा मिळतो म्हणूनच याकडे सर्रासपणे डोळेझाक केली जात आहे.सगळ्यात दुर्दैवाची बाब म्हणजे आज कौळाणे ग्रामपंचायतीकडे स्वतःच्या मालकीची गावठाण जागा असतानाही,ग्रामपंचायत मात्र घरकुल धारकांना घरे बांधून देण्यासाठी जागा उपलब्ध करुन देऊ शकत नाही,यापेक्षा मोठे व भयानक शोकांतिका आणखी काय असू शकते?म्हणजेच गावात बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्याच्या पाठीशी ग्रामपंचायत प्रशासन खंबीरपणे उभे आहे,तर नियमानुसार कामे करणाऱ्या व्यक्तीना अडवणूक करुन त्रस्त करण्याचे आडमुठे धोरण कौळाणे ग्रामपंचायतीने स्विकारलेले असल्याने एकंदरीतच काय,तर धन्याला धतुरा व चोराला मलिदा अशी ही कौळाणे ग्रामपंचायतीची पाताळयंत्री कुटील डावपेची षडयंत्र भविष्यात गावाला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही.(क्रमशः उद्या वाचा लाखो रुपयाचा पाण्यासाठीच खर्च गेला पाण्यात!ऐन पावसाळ्यात गावाला प्यावे लागते विकतचे पाणी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here