Home रत्नागिरी गणपतीपुळे समुद्रकिनारी जयगड पोलीस ठाण्याकडून रेड झोनची निर्मिती ! सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचा...

गणपतीपुळे समुद्रकिनारी जयगड पोलीस ठाण्याकडून रेड झोनची निर्मिती ! सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचा निर्णय

47
0

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0045.jpg

गणपतीपुळे समुद्रकिनारी जयगड पोलीस ठाण्याकडून रेड झोनची निर्मिती ! सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचा निर्णय                                                              रत्नागिरी,(सुनील धावडे)

पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी पुणे चाकण येथील गुलशन राठोड हा तरुण बुडाला होता. मात्र त्यानंतर त्याला वाचवण्यात येथील तरुणाला यश आले. या घटनेने जयगड पोलिस स्थानकाचे पोलीस अधिकारी जयदीप कळेकर यांच्या विशेष पुढाकाराने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा विचार करून गणपतीपुळे समुद्रकिनारी रेड झोनची निर्मिती करण्यात आली आहे.

पावसाळ्यात गणपतीपुळे समुद्राचा बदलणारा प्रवाह आणि त्यानंतर ठिकठिकाणी पडणारे चाळ लक्षात घेता येणाऱ्या पर्यटकांना समुद्रस्नान करताना येथील समुद्राची योग्य ती माहिती नसल्यामुळे पर्यटक समुद्राच्या खोल पाण्यात जाऊन आंघोळ करण्याचा करण्याचे अतिरेक करतात. हाच अतिरेक आणि अतिउत्साह पर्यटकांच्या जीवावर बेततो. अखेर त्या समुद्राच्या चाळात अडकून पर्यटक बुडू लागतो. परंतु समुद्रात पडलेले चाळ लक्षात घेऊन जयगड पोलीस ठाण्याने संबधित चाळ असलेल्या अंतरावर रेड झोन लावून समुद्राचा धोकादायक भाग दर्शविला आहे. त्यामध्ये समुद्रकिनाऱ्यावर लाल झेंडे दोन्ही साईडला दर्शवून रेड झोनचा भाग तयार केला आहे.

आता आलेल्या पर्यटकांना त्या भागात आंघोळीसाठी न उतरवण्याचे आवाहन जयगड पोलीस ठाण्याकडून पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी केले आहे. तसेच गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या जीव रक्षकांना याबाबत सूचनाही केल्या आहेत. गणपतीपुळे ग्रामपंचायतीला ही आपले जीवरक्षक कायमस्वरुपी समुद्रकिनाऱ्यावर तैनात ठेवावेत अशा सूचना दिल्या आहेत.

या संदर्भात जयगड पोलिस ठाण्याकडून एक विशेष पत्र गणपतीपुळे ग्रामपंचायतीला पाठवण्यात येणार असल्याची माहिती जयगड पोलीस ठाण्याकडून प्राप्त झाली आहे .

Previous articleगणपतराव ब्रिद माध्यमिक विद्यालय तांबडी चे मुख्याध्यापक एकनाथ राऊत सेवानिवृत्त
Next articleखेड तालुक्यातील दयाळ येथील तरुणांचा मनसेत प्रवेश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here