Home बुलढाणा पोळा सणाला बीडीडीएस पथक बुलढाणाच्या श्वान- शेरा तसेच तस्संम साधनांचा वापर करून...

पोळा सणाला बीडीडीएस पथक बुलढाणाच्या श्वान- शेरा तसेच तस्संम साधनांचा वापर करून केली घातपात तपासणी

98
0

आशाताई बच्छाव

IMG-20220828-WA0063.jpg

पोळा सणाला बीडीडीएस पथक बुलढाणाच्या श्वान- शेरा तसेच तस्संम साधनांचा वापर करून केली घातपात तपासणी

युवा मराठा वेब न्युज पोर्टल
प्रतिनिधी- रवी शिरस्कार, संग्रामपूर

आपल्या संस्कृतीत पोळा हा विशेष आणि महत्त्वाचा सन आहे. तो उत्साहाने साजरा केला जातो.
त्यामध्ये प्रत्येक गावातील सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत मिरवणूकी काढल्या जातात लोक एकत्र येऊन. प्रत्येक गावचा ‘मानवाईक’ बैल तोरण तोडुन पोळा फुटतो आणि हे पाहण्यासाठी गावातील सर्व मंडळी एकत्र येत असतात.
या सणाला होत असलेल्या गर्दीला पाहून कोणताही घातपात न होण्याकरिता मा.पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया बुलढाणा, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २५ऑगस्ट रोजी शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर परिसर, रेल्वे स्टेशन परिसर, शेगाव बसस्टँड परिसर,खामगाव बसस्टँड परिसर त्याचप्रमाणे वरवट बकाल येथील 132 KV विद्युत सबस्टेशन आणि संग्रामपूर येथील बस स्टँड परिसर या सर्व ठिकाणची घातपात तपासणी पोलिसांच्या फौजफाट्यातील सर्वात महत्त्वाचा व आपत्कालीन परिस्थितीचा आधार असलेला विभाग म्हणजे बॉम्बशोधक आणि बाँब नाशक यांच्या बीडीडीएस बुलढाणा द्वारे हुकुमी एक्के समजल्या जाणारे श्वान आणि पथकाच्या इतर तस्संम साधनांचा वापर करून करण्यात आली आहे. त्यानंतर सदर पथक हे संग्रामपूर वरून पुढील तपासणी करिता जळगाव जा. कडे रवाना झाले होते.
यावेळी PSI मोबिन शेख, ASI अमरसिंग,हेड कॉन्स्टेबल ठाकुर, हेड कॉन्स्टेबल वैष्णव, हेड कॉन्स्टेबल कोसे, डॉग हँडलर गणेश जमदाळे, व शेरा नाव असलेला डॉग ह्या बीडीडीएस पथक बुलढाणा यांच्या मदतीने ह्या संपुर्ण तपासण्या घेण्यात आल्या आहे.

Previous articleसहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथे पोळा सण उत्साहात साजरा!
Next articleआधुनिक तंत्रज्ञानाचा तिसरा डोळा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here