Home गडचिरोली शेतकरी कामगार पक्षातर्फे मोफत चष्मे वाटप करणार जयश्री वेळदा – जराते यांच्या...

शेतकरी कामगार पक्षातर्फे मोफत चष्मे वाटप करणार जयश्री वेळदा – जराते यांच्या पुढाकारातून शिबिरांचे आयोजन

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20231015-WA0081.jpg

 

शेतकरी कामगार पक्षातर्फे मोफत चष्मे वाटप करणार

जयश्री वेळदा – जराते यांच्या पुढाकारातून शिबिरांचे आयोजन

गडचिरोली,(सुरज गुंडमवार विभागीय संपादक) : शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सामाजिक दायित्व जोपासण्याच्या दृष्टीने मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून गरजूंच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठीही पाठपुरावा करण्यात येणार आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या चित्रलेखा पाटील यांच्या सहकार्याने गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये सदर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. सोमवारपासून या शिबिरांना सुरुवात करण्यात येत असून सोमवारला पुलखल, मंगळवारी मुडझा, बुधवारला शिवणी, गुरुवार गुरवळा, शुक्रवार मारकबोडी, तर शनिवारला मेंढा येथे पहिल्या टप्प्यात या मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ११.०० ते ३.०० दरम्यान तज्ज्ञांकडून डोळे तपासणी तर ३.०० वाजता जयश्री वेळदा – जराते यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप असे या शिबिरांचे नियमित वेळापत्रक राहणार आहे. सदर मोफत शिबिरांचा लाभ मोठ्या संख्येने जनतेने घ्यावा, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, रोहिदास कुमरे, जयश्री वेळदा – जराते, भाई अक्षय कोसनकर, तुकाराम गेडाम, देवेंद्र भोयर, तुळशीदास भैसारे, चंद्रकांत भोयर, नितीन मेश्राम, डंबाजी भोयर, देवानंद साखरे, वसंत चौधरी यांनी केले आहे.

Previous articleदिवंगत राष्ट्रपती डॉ. कलाम जयंती जगदंबा सार्वजनिक वाचनालय वानखेड मध्ये वाचन दिवस म्हणून साजरी
Next articleअवयवदान : श्रेष्ठतम दान !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here