Home रत्नागिरी गणपतीपुळे येथे बीच स्वच्छता मोहीम

गणपतीपुळे येथे बीच स्वच्छता मोहीम

68
0

आशाताई बच्छाव

IMG-20220828-WA0023.jpg

गणपतीपुळे येथे बीच स्वच्छता मोहीम                      रत्नागिरी,(सुनील धावडे)

रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे सागरी किनारे स्वच्छता मोहीम अंतर्गत तहसीलदार कार्यालय रत्नागिरी, पंचायत समिती कार्यालय रत्नागिरी,जिंदाल उद्योग समूह जयगड, ग्रामपंचायत गणपतीपुळे, पर्यटक निवास गणपतीपुळे, पर्यटन व्यावसायीक संघटना व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यामाने गणपतीपुळे बीच स्वच्छता मोहीम शनिवारी २७ ऑगस्ट रोजी सकाळी राबवण्यात आली.

यावेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार कार्यालय व पंचायत समिती कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी किनारे स्वच्छता मोहीम अंतर्गत गणपतीपुळे बीच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी संपर्क अधिकारी म्हणून आर पी सकपाळ कृषी पंचायत समिती रत्नागिरी यांनी काम पाहिले रत्नागिरी तालुक्यात सागरी किनारे स्वच्छता मोहीम अंतर्गत 20 /8 /2022 ते 3/ 9/ 2022 या कालावधीत 7:30 ते 11 या वेळात बीच स्वच्छता अभियान राबवण्यात येत असून आज दिनांक 27/ 8/ 2022 रोजी गणपतीपुळे बीच स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी समुद्रातून वाहून आलेल्या वस्तू कचरा प्लास्टिक आदी विविध प्रकारचा कचरा गोळा करून ग्रामपंचायत गणपतीपुळे यांच्या घंटागाडी वाहनाने नेऊन योग्य प्रकारे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली गणपतीपुळे बीच स्वच्छता मोहीम साठी संपर्क अधिकारी आरपी सकपाळ कृषी पंचायत समिती रत्नागिरी सविनय जाधव जिल्हा परिषद रत्नागिरी एम एस वारेकर व हेमंत दराडे पंचायत समिती रत्नागिरी मालगुंड मंडळ अधिकारी एस एस कांबळे तलाठी रोहित पाठक गणपतीपुळे सरपंच कल्पना पकये उपसरपंच महेश केदार ग्रामपंचायत सदस्य संजय माने, शुभांगी ठावरे ग्रामसेवक प्रवीण चौधरी, जिंदाल उद्योग समूहाचे विभाग प्रमुख करुणाकांत दवे व अनिल धधीच यांच्या मार्गदर्शनाखाली योगिता महाकाळ व कर्मचारी वर्ग ,पर्यटन व्यावसायिक संघटना अध्यक्ष प्रमोद केळकर पर्यटन विकास महामंडळ पर्यटन निवास गणपतीपुळे सहाय्यक व्यवस्थापक रुपेश करंडे व कर्मचारी वर्ग , वरवडे बंदर कार्यालयाचे कर्मचारी रविंद्र चव्हाण,मिलिंद डोंगरे ,आदिंसह ग्रामस्थ रवींद्र ठावरे ,शंकर भन्सारी तसेच मंदिर परिसरातील पर्यटक व्यावसायिक फोटोग्राफर आदी सहभागी झाले होते

Previous articleछत्रपती संभाजीराजेंचे नेतृत्व नको; मराठा क्रांती मोर्चात ठिणगी
Next articleखड्डे बुजवण्याची मागणी गोट्या खेळत करत राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here