Home मुंबई छत्रपती संभाजीराजेंचे नेतृत्व नको; मराठा क्रांती मोर्चात ठिणगी

छत्रपती संभाजीराजेंचे नेतृत्व नको; मराठा क्रांती मोर्चात ठिणगी

39
0

आशाताई बच्छाव

IMG-20220828-WA0024.jpg

छत्रपती संभाजीराजेंचे नेतृत्व नको; मराठा क्रांती मोर्चात ठिणगी                                                   मुंबई,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)

मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांचे आम्हाला नेतृत्व नको. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा सन्मान करतो; मात्र छत्रपती संभाजीराजे यांचे आम्हाला नेतृत्व मान्य नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाने सांगितले आहे. राज्य सरकारने बोलावलेल्या बैठकीत छत्रपती संभाजी राजेंनी समन्वयकांना बोलू न दिल्याने औरंगाबादेतील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे संभाजीराजेंनी आता आमचे नेतृत्व करू नये, अशी भूमिकाच मांडली आहे.

नेतृत्व करत असताना सर्व समावेशक आणि व्यापक असले पाहिजे. कोपर्डी प्रकरणापासून अन्यायाला वाचा फुटली. त्यानंतर आम्ही सर्व एकत्र आलो, जे पहिल्यापासून सर्वजण एकत्र होते. कालच्या बैठकीला त्यापैकी एकही माणूस नव्हता. नेमकी नेतृत्व करण्याची जबाबदारी कुणी दिली? कुणी सांगितले हे आमचे नेतृत्व आहे? आमचे कुणीही नेतृत्व नाही, हे आम्हाला मान्य नाही. फक्त छत्रपती शिवराय हेच आमचे नेतृत्व आहे, असे मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचे म्हणणे आहे.

समन्वयकांचा इशारा
तुम्ही तुमच्या बैठका रात्रीच्या अंधारामध्ये घेता. काय चाललंय काय नेमकं? सर्व व्यापक बैठका का होत नाहीत. मोजकेच लोक गोळा करता. मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व कुणीही नाही. औरंगाबादमधून मोर्चाला सुरुवात झाली, आम्ही त्या मोर्चाचे शिलेदार आहोत. आमच्यासोबत चर्चा होत नसेल तर तुम्हाला पळताभुई थोडी होईल. अशी अवस्था केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही समन्वयकांनी दिला.

Previous articleचोरवणे येथे चिखल-नांगरणी स्पर्धा जोशात
Next articleगणपतीपुळे येथे बीच स्वच्छता मोहीम
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here