• Home
  • 🛑 संभाजीराजेंचा सरकारला इशारा….! आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत 🛑

🛑 संभाजीराजेंचा सरकारला इशारा….! आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत 🛑

🛑 संभाजीराजेंचा सरकारला इशारा….! आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा )

मुंबई :⭕ मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत सरकारला जाब विचारला आहे.

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने घातलेली स्थगिती उठवण्यासाठी सरकार काय नियोजन करत आहे,अशी विचारणा यावेळी संभाजीराजे भोसले यांनी केली.तर आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असून आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीय असा इशारा संभाजीराजे भोसले यांनी दिला आहे.

आज मराठा क्रांती मोर्चा महामुंबईच्या वतीने वांद्रे मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आक्रोश आंदोलनात त्यांनी सभागत घेतला होता.यावेळी ते बोलत होते.

यावर बोलताना संभाजीराजे भोसले म्हणाले, “आज आपली लढाई सर्वोच्च न्यायालयात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला, तो आपण मान्यच करावा लागतो आणि आम्ही सन्मान सुद्धा करतो. त्याबद्दल काही दुमत नाही. पण माझे सरकारला हेच म्हणणे आहे की,आम्ही किती दिवस शांत बसायचे. किती दिवस मोर्चे काढायचे, किती दिवस बैठक घ्यायच्या. सर्वोच्च न्यायालयात आता आरक्षणाला स्थगिती आहे. ती स्थगिती उठवण्यासाठी उद्या न्यायालयात तारीख आहे.

माझे सरकारला हेच आवाहन आहे की, बाकीची कामे सगळी बंद करा, बहुजन समाजाला न्याय देण्याची जबाबदारी सरकारची आहे.

केवळ कारण सांगून चालणार नाही सरकारने भूमिका घेणे गरजेचे आहे”, असे संभाजीराजे यांनी म्हटले….⭕

anews Banner

Leave A Comment