Home Breaking News तलावावर बैल धुण्यासाठी गेलेल्या तरुणाला जलसमाधी!; खामगाव तालुक्यातील घटना

तलावावर बैल धुण्यासाठी गेलेल्या तरुणाला जलसमाधी!; खामगाव तालुक्यातील घटना

613

तलावावर बैल धुण्यासाठी गेलेल्या तरुणाला जलसमाधी!; खामगाव तालुक्यातील घटना

बूलडाणा :-ब्यूरो चीफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज नेटवर्क

पोळा सणानिमित्त बैलांना
धुण्यासाठी तलावावर गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज, ५ सप्टेंबर रोजी बोरी आडगाव (ता. खामगाव) येथे सकाळी १० वाजता घडली. आशुतोष निरंजन सुरवाडे (२२, रा. बोरी आडगाव, ता. खामगाव) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैल धुण्याची परंपरा आहे. आज आशुतोष बैल धुण्यासाठी तलावावर गेला होता. तलावात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. सोबत असलेल्या नागरिकांना ही बाब लक्षात येताच त्याला पाण्याच्या बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. आशुतोष बोरी आडगाव येथील माजी सरपंच निरंजन सुरवाडे यांचा मोठा मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे.

Previous articleअवैध रेती वाहतुकीचे टिप्पर खामगावमध्ये पकडले; ३ लाखांची कारवाई
Next articleडॉक्टर संदीप मोहिते यांना विवेक वाचनालय अंबप मार्फत वैद्यकीय क्षेत्रातील राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.