Home रत्नागिरी चौपदरीकरणाला विलंब; सरकार नव्हे ठेकेदार जबाबदार : रवींद्र चव्हाण

चौपदरीकरणाला विलंब; सरकार नव्हे ठेकेदार जबाबदार : रवींद्र चव्हाण

80
0

आशाताई बच्छाव

IMG-20220828-WA0026.jpg

चौपदरीकरणाला विलंब; सरकार नव्हे ठेकेदार जबाबदार : रवींद्र चव्हाण

चिपळूण/रत्नागिरी,(सुनील धावडे) : मुंबई-गोवा महामार्गाच्या विलंबाला सरकार जबाबदार नाही. सरकार कोणतेही असो, केंद्र व राज्य सरकारने या प्रकल्पासाठी पूर्ण प्रयत्न केला आहे. निधीची कोणतीही अडचण नाही. मात्र, ठेकेदार कंपन्यांमुळे आणि वेगवेगळ्या कारणांमुळे हा महामार्ग रखडला आहे, असे स्पष्ट मत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी त्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील खड्डे पूर्णपणे भरले जातील आणि महामार्ग चाकरमान्यांसाठी सुस्थितीत असेल, असे सांगितले.

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. पनवेलपासून चिपळूणपर्यंत पाहणी केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी कापसाळ येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, अनेकवेळा आम्ही भाजपचे आमदार म्हणून राज्य शासनाकडे महामार्गासाठी निधी मागितला. त्यावेळी तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य शासनाकडे निधी नाही असे सांगितले. नितीन गडकरी यांनी ‘बीओटी’ तत्त्वावर या महामार्गाला मंजुरी दिली. यामुळे आम्हाला सर्वांनाच आनंद झाला.

कोकणातील सर्व आमदार हा महामार्ग व्हावा म्हणून सकारात्मक आहेत. प्रत्येक राज्य व केंद्र सरकारने त्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यामुळे महामार्गाच्या चौपदरीकरण विलंबाला शासन जबाबदार नसून त्या-त्याठिकाणच्या ठेकेदारांनी कामाचा खोळंबा केला आहे. त्यामुळे न्यायालयीन लढा सुरू आहे. याचा परिणाम महामार्गाच्या कामावर झाला आहे असे सांगितले. मात्र, डिसेंबर २०२३ पर्यंत चौपदरीकरण पूर्ण केले जाईल, असा विश्वास त्यांनी दिला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काँक्रीट, खडी, रेती व डांबरीकरण असे तीनप्रकारे खड्डे भरणे सुरू आहे. त्यासाठी दहा कि.मी.च्या अंतरावर अभियंत्यांची नेमणूक झाली आहे. गणेशोत्सवाचे पाच दिवस हे काम कायम सुरू असेल असे नाम. चव्हाण यांनी सांगितले.

Previous articleगोगटे- जोगळेकरच्या स्वरूप आणि प्रियांकाला संस्कृतविषयासाठीचा डॉ. मो. दि. पराडकर पुरस्कार प्राप्त
Next articleचोरवणे येथे चिखल-नांगरणी स्पर्धा जोशात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here