Home रत्नागिरी चिपळूणमध्ये अपघातातील मृत्यू झालेल्या तरूणाच्या कुटुंबाला मदत करण्याच्या बांधकाम मंत्र्याच्या सूचना

चिपळूणमध्ये अपघातातील मृत्यू झालेल्या तरूणाच्या कुटुंबाला मदत करण्याच्या बांधकाम मंत्र्याच्या सूचना

69
0

आशाताई बच्छाव

IMG-20220824-WA0016.jpg

चिपळूणमध्ये अपघातातील मृत्यू झालेल्या तरूणाच्या कुटुंबाला मदत करण्याच्या बांधकाम मंत्र्याच्या सूचना   रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

शहरातून जाणान्या मुंबई-गोवा महामार्गावर दि. २० ऑगस्ट रोजी एका अपघातामध्ये दुचाकीस्वाराचे निधन झाले. या संपूर्ण घटनेची माहिती भाजप युवा मो तालुका सरचिटणीस मंदार कदम यांनी भाजप युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धनांना दिली. त्यांनी सदर घटना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांना कळविली. या घटनेची दखल घेत ना. चव्हाण यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक रत्नागिरी, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती घेऊन या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबास पूर्णपणे सहकार्य आणि योग्य मदत करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.

संबंधित अधिक सातत्याने संपर्कात राहून पडलेल्या घटनेची माहिती मंत्रीमहोदय स्वतः घेत होते त्यांनी संबंधित कंपनीला मृत व्यक्तीच्या कुटुंबास तत्काळ योग्य ती मदत करण्याची सूचना केली त्याप्रमाणे कंपनीच्या अधिकान्यांनी या कुटुंबास सर्वतोपरी सहकार्य व तसेच योग्य ती मदत करण्याचे आश्वासन ना. रवींद्र चव्हाण यांना दिले. घडलेली घटना दुर्दैवी असून पाकर परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत, तसेच त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी भावना या वेळी ना. चव्हाण यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here