Home रत्नागिरी रत्नागिरी – पावस मार्गावरील भाट्ये येथे पावडरची वाहतूक करणारा मालवाहू ट्रक छाेटा...

रत्नागिरी – पावस मार्गावरील भाट्ये येथे पावडरची वाहतूक करणारा मालवाहू ट्रक छाेटा हत्ती टेम्पाेवर पलटी झाल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20220824-WA0018.jpg

रत्नागिरी – पावस मार्गावरील भाट्ये येथे पावडरची वाहतूक करणारा मालवाहू ट्रक छाेटा हत्ती टेम्पाेवर पलटी झाल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) – पावस मार्गावरील भाट्ये येथील अवघड वळणावर पावडरची वाहतूक करणारा मालवाहू ट्रक छाेटा हत्ती टेम्पाेवर पलटी झाल्याची घटना आज, मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान घडली.ट्रकखाली अडकलेल्या टेम्पाेतील चालकाला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु हाेते. मात्र, टेम्पाेत अडकून पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

फिनाेलक्स कंपनीतून मालवाहतूक ट्रक (जीजे १६, एयु ५४१५) चालक सुनील कुमार तरसिमलाल ललहाेत्रा (रा. पंजाब) रत्नागिरीच्या दिशेने येत हाेता.तर रत्नागिरीतून पूर्णगडच्या दिशेने सिकंदर गावखडकर छाेटा हत्ती टेम्पाे (एमएच ०८, एपी १३५७) घेऊन जात हाेता. त्यांच्यासाेबत गालिफ पांढरे आणि प्रजाली प्रताप पेटकर (सर्व रा. पूर्णगड) हे प्रवास करत हाेते.

भाट्ये येथील अवघड वळणावर मालवाहू ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक उलटला. हा ट्रक समाेरुन येणाऱ्या टेम्पाेवर पडल्याने टेम्पाे ट्रकखाली अडकून पडला हाेता. टेम्पाेचालकासह प्रवासी अडकून पडल्याने त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु हाेते. त्यातील दाेघांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. मात्र, टेम्पाे चालकाचा टेम्पाेत अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here