Home बुलढाणा गुरव समाज लोकसेवा ट्रस्ट च्या वतीने १०८ बेलपत्र रोपांचे वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम

गुरव समाज लोकसेवा ट्रस्ट च्या वतीने १०८ बेलपत्र रोपांचे वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम

137

आशाताई बच्छाव

IMG-20220824-WA0017.jpg

गुरव समाज लोकसेवा ट्रस्ट च्या वतीने १०८ बेलपत्र रोपांचे वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम

युवा मराठा वेब न्यूज पोर्टल प्रतिनिधी रवींद्र शिरस्कार संग्रामपूर.

गुरव समाजाचे लोकसेवा ट्रस्ट खामगाव,यांच्या वतीने नुकतेच रविवार दिनांक. २१ ऑगस्ट २०२२ रोजी स्थळ खामगाव मधील घाटपुरी येथे असलेल्या लेकुरवाडी या टेकडीवर १०८ बेलपत्र वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
श्रावण महिन्यात पिंडीवर बेल वाहन्याची प्रथा ही अनंत काळापासून सुरू असून, प्रत्येक शिवभक्ताला घरपोच बेलपत्र पोहोचविण्याचे कार्य महाराष्ट्रा सोबतच मध्यप्रदेशात हे कार्य गुरव समाज अनेक वर्षांपासून करीत आहे.
याच व्यवसायावर या समाजाची उपजीविका आहे. परंतू आज समाजातील असंख्य लोक शिक्षणामुळे नोकरी, व्यवसायात आहेत व हा बेलपत्र वाटण्याचा व्यवसाय काही समाजबांधव तुरळक प्रमाणात करतात.
आजही अनेक शिवभक्त गुरव कडुन महादेवाला बेलपत्र वाहिल्यास बेलपत्र पावन होते असे मानतात.एवढे मात्र निश्चित. सद्या हे बेलपत्र सहसा पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत सोबतच या बेलवृक्षची संख्येत सुध्दा खुप घट झाली आहे. खामगाव येथे दिनांक २१ ऑगेस्ट रोजी *गुरव समाजातील लोकसेवा ट्रस्टच्या* वतीने दोन फुट ऊंचीचे १०८ वृक्षारोपण घाटपूरी मधील लेकुरवाडी या टेकडीवर बेलपत्र वृक्षांच्या लागवडीचा ”१०८ बेलपत्र लागवड” हा बुलढाणा जिल्ह्यातील पहिला आणि अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. व त्याच प्रकारे याच्या संपुर्ण संगोपन आणि संवर्धनाची सर्वस्व जबाबदारी सर्व गुरव समाज बांधवांनी घेतली आहे.
श्रावण महिन्यात प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने शिवाची आराधना करीत असतो व या महिन्यात पिंडीवर बेलपत्र वाहन्या करीता त्यास अनेकवेळा ते उपलब्ध होत नाही . म्हणूनच या उपक्रमाची संकल्पना कलाध्यापक संजय गुरव यांनी समाचे अध्यक्ष प्रशांत मेंदुरकर यांचे कडे मांडली व सर्व सभासदांनी होकार देऊन कार्य पूर्णत्वास नेले. भविष्यात गुरव समाजाचे हातून जर बेलपत्र नाही मिळत असले तरी गुरव समाजाचे हातून लावलेल्या बेलवृक्षाचे बेलपत्र शिवभक्तांना मिळेल याचे गुरव बांधवाना समाधान राहील, आणि त्यांच्या करिता ही अविस्मरणीय बाब ठरेल, गुरव समाज लोकसेवा ट्रस्ट खामगाव यांनी समाज बांधवांकरिता हा उद्देश समोर ठेऊन हा उपक्रम राबिविला आहे…
या बेलवृक्ष लागवड उपक्रमा करीता संस्थेचे सचिव नारायण दांडगे, कोषाध्यक्ष गजानन खंडार, प्रफुल्ल बाळापूरे, दत्ताभाऊ वाघमारे, अशोक आगरकर, गजानन आडसकर, अजय बाळापूरे, नितिन राजनकर, सचिन पारखेडकर, संतोष पारखेडकर, संकेत बाळापूरे, सौ. मंगला गुरव, सौ.राणी मेंटुरकर, सौ. उमाताई तांबोळी, सौ. वैशाली बाळापूरे, सौ. पुजाताई सेलकर यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous articleनांदगांव तालुक्यात साथीचे साम्राज्य         
Next articleचिपळूणमध्ये अपघातातील मृत्यू झालेल्या तरूणाच्या कुटुंबाला मदत करण्याच्या बांधकाम मंत्र्याच्या सूचना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.