Home नाशिक कासलीवाल विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा सहकार सहकार महर्षी बापुसाहेब कवडे यांच्या हस्ते...

कासलीवाल विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा सहकार सहकार महर्षी बापुसाहेब कवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

66
0

आशाताई बच्छाव

IMG-20220816-WA0058.jpg

कासलीवाल विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा सहकार सहकार महर्षी बापुसाहेब कवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

नांदगाव-प्रतिनिधी, अनिल धामणे
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कुल व सौ.क.मा.कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सहकार महर्षी
बापुसाहेब कवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मुख्याध्यापक, मनी चावला यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ‘आजादी’ म्हणजे नेमकं काय याचे सुंदर शब्दांत विवेचन केले.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.यात देशभक्तीपर गीत,भाषण,नृत्य,सादर करून उपस्थितांची मने जिंकली.तसेच जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कुल चे शिक्षक विनोद अहिरे सरांनी देखील देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले .
या कार्यक्रमात मागील शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. सौ.क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयातील
1)समीक्षा रविंद्र बोराळे
2)दिव्या चंद्रभान घोटेकर
3)यश हेमंत मोहिते
या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय
तर जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कुलच्या
1)संस्कृती भरतराज चव्हाण
2)मेहेक आनंद काला
2)निधी कमलेश सुराणा
3)स्नेहा संतोष गायकवाड
या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.
तसेच मागील वर्षातील इयत्ता नववीच्या वर्गात प्रथम आलेल्या सौ.क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयातील गायत्री संतोष राऊत
व जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कुलचे विद्यार्थी सार्थक विजय देशमुख व पूनम नीलेश सुराणा या विद्यार्थ्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी
संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, विश्वस्त रिखबचंद
कासलीवाल, महेंद्र चांदीवाल, जुगलकिशोर अग्रवाल,सुशिल कुमार कासलीवाल,श्रीमती
शोभा, कासलीवाल,प्रमिला, कासलीवाल निर्मला, कासलीवाल ,पुषा, चांदीवाल मीना, जैन,मयुरी,कासलीवाल
प्रशासन अधिकारी पी.पी गुप्ता , अंकुर कासलीवाल ,समीर कासलीवाल, अभिजित कासलीवाल,
मुख्याध्यापक ,गोरख डफाळ, विशाल सावंत, मुख्याध्यापक मनी चावला तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका रक्ताटे व सुवर्णा आव्हाड यांनी तर सिद्धार्थ जगताप यांनी आभार मानले केले.

Previous articleकै.पुंडलिक पांडूरंग मवाळ विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.वसंत,मवाऴ,यांच्या हस्ते . ध्वजारोहण         
Next articleग्रा.प.बोरी येतील जि.प. शाळेत नवीन वर्ग खोलीच्या उदघाटन सम्पन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here