Home नाशिक कै.पुंडलिक पांडूरंग मवाळ विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.वसंत,मवाऴ,यांच्या हस्ते . ध्वजारोहण   ...

कै.पुंडलिक पांडूरंग मवाळ विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.वसंत,मवाऴ,यांच्या हस्ते . ध्वजारोहण         

96
0

आशाताई बच्छाव

IMG-20220816-WA0053.jpg

कै.पुंडलिक पांडूरंग मवाळ विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.वसंत,मवाऴ,यांच्या हस्ते . ध्वजारोहण                                                नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे
पिंपरखेड : दि. १५ अॉगष्ट २०२२. येथील कै. पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालयात आज रोजी विजय शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस मा.श्री वसंतराव नाना मवाळ यांच्या हस्ते विद्यालयाचे ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी चिटणीस श्री. शिवराम किसन कांदळकर, संचालक संभाजी (दादा)मवाळ अशोक(आण्णा) सानप, शंकर घोटेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.डाॅ.अभिजित गोविंदराव मवाळ.श्रीमती मवाळ यांनी राष्ट्रीय ध्वज आणि भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.गावातील प्रतिष्ठीत व जेष्ठ नागरिक,आजी-माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. माजी मुख्याध्यापक श्री. मवाळ यांनी शाळेस बेंच घेण्यासाठी २५००० हजार रुपयांचा धनादेश मुख्याध्यापक श्री. गवळी यांच्याकडे सुपूर्द केला. इ. १०वी शालांत प्रमाणपत्र परिक्षा मार्च २२ मधील गुणवंत विद्यार्थ्यांना डॉ.अभिजित मवाळ सरांनी प्रथम क्रमांकास ५००१, द्वितीय क्रमांकास ३००१, तृतीय क्रमांकास २००१ रु.वडील, आजोबा आणि आजीच्या स्मरणार्थ रोख स्वरूपात दिले तसेच सरचिटणीस बापूसाहेब मवाळ यांनी पण १००१ रु.चे बक्षीस वडीलांच्या स्मरणार्थ , शिवाजी सुपडू चव्हाण यांनी पण वडिलांच्या स्मरणार्थ १००१रु.चे रोख बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
तसेच चिटणीस शिवराम आबा मुख्याध्यापक श्री. गवळी सरपंच श्री. सोनवणे, मा.मुख्या.मवाळ निलेश देशमुख, हनुमंत दादा,बबन जाधव, श्रीमती ज्योती गरुड यांनी पण विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देऊन प्रोत्साहित केले .स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीते गाऊन कार्यक्रमात रंगत आणली. अतिशय जल्लोषात 75 व्या स्वातंत्र्य दिनाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री. बोरसे श्रीमती शिंदे श्री पठाडे श्री. सोनवणे श्री. जाधव श्री. संदीप भाऊसाहेब, श्री आबा सोनवणे, श्री. निलेश चव्हाण व संदीपभाऊ मवाळ मित्रमंडळाचे सहकार्य लाभले. तर सुत्र संचालन श्री.कांदळकर सर कु.कोमल देशमुख, कु.निकिता मोरे यांनी केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here