• Home
  • *थुंकीमुक्त इचलकरंजी साठी इ.ना.मंचचा पुढाकार*

*थुंकीमुक्त इचलकरंजी साठी इ.ना.मंचचा पुढाकार*

*थुंकीमुक्त इचलकरंजी साठी इ.ना.मंचचा पुढाकार*

*कोल्हापूर ( मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात कोरोनाचा संसर्गाचा प्रसार आणि मृत्युदरचा आलेख वाढत आहे , सध्या यावर आत काही प्रमाणात नियंत्रण आले असुन ,कोरोनाचा नायनाट होण्यासाठी स्वयंशिस्त गरजेची आहे. प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करत आहेच. कोरोनामुक्तीसाठी इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने थुंकीमुक्त इचलकरंजीचा निर्धार करण्यात आला. मा.शिवकुमार मुरतुले सर यांच्या संकल्पनेतून इचलकरंजी नागरिक मंचच्या कार्यकर्त्यांनी आज थुंकीमुक्त इचलकरंजी साठी कॉ. के. एल .मलाबादे चौक व महात्मा गांधी पुतळा परिसरात थुंकीमुक्त इचलकरंजी साठी जनाजगृती करण्यात आली , पोस्टर व घोषणांद्वारे नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. इचलकरंजी नागरिक मंचद्वारे पुढाकार घेऊन सुरवात झालेल्या या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाने करावी तसेच थुंकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी इ.ना.म.तर्फे करण्यात आली आहे.
या उपक्रमात इचलकरंजी नागरिक मंच चे राजु कोन्नूर ,अमित बियाणी , सुहास पाटील,शितल मगदूम , विद्यासागर चराटे , अमित सारडा , संजय डाके,उदयसिंह निंबाळकर , आप्पासाहेब पाटील सर , रविंद्र भंडारी,एड पवन उपाध्ये , सचिन बाबर ,महेंद्र जाधव , दिपक पंडित , राजु पारीख , दिपक जाधव , अमृत पारख , हरीश देवाडीगा , नितीन ठिगळे , राजेश बांगड , संजय सुतार ,लक्ष्मीकांत खंडेलवाल , पंडित ढवळे , सारंग भांबुरे , अभिजित पटवा आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

anews Banner

Leave A Comment