आशाताई बच्छाव
नोकरीतून सेवानिवृती सन्मानाचे
जीवन;नामपूरला सेवानिवृती समारंभ उत्साहात साजरा
युवा मराठाचे राजेंद्र पाटील यांची उपस्थिती
जायखेडा,(सुभाष अंकुशे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- आपल्या आयुष्यात नोकरीचा काळ हा मोठ्या दगदगीचा असतो आणि तरीही आपल्या नोकरीच्या कार्यकाळात आपल्या विभागातील अधिकारी ,कर्मचारी व शेतकरी जनतेला आपलेसे करुन घेण्याचे भाग्य क्वचितच व्यक्तीना लाभते असे प्रतिपादन काल (मंगळवार दि.३१ मे) रोजी आयोजीत सेवानिवृती समारंभ कार्यक्रमात नामपूर,ता.सटाणा येथे युवा मराठा न्युजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांनी बोलताना केले.
कृषी खात्यात ताहराबाद येथे कृषी सहाय्यक या पदावर कार्यरत असलेले श्री.डी.यु.पवार यांच्या नोकरीतील काल सेवासमाप्तीचा अखेरचा दिवस असल्याने सटाणा तालुका कृषी विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास मालेगांव उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप नाना देवरे,तंत्रअधिकारी गोकुळ अहिरे,सटाणा तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार,आसखेडा येथील प्रगतशील शेतकरी अमृत नामदेव कापडणीस आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.नामपूर जवळील नळकेस रोडवरील शेतात या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते.यावेळी कृषी सहाय्यक डि.यु.पवार यांचा सपत्नीक विविध मान्यवरांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम ग्रामविकास अधिकारी सुनील उतमराव पवार व युवा मराठा न्युज टि.व्ही.च्या वृतनिवेदिका दिपाली पवार यांनी घेतलेत.कार्यक्रमासाठी बहुसंख्येने नागरिकांची उपस्थिती लाभली.






