*कौळाणे,व-हाणेत ग्रामपंचायत चौकशीला आजपासून सुरुवात*
*चौकशीत निष्पन्न होणार दडलेले रहस्य*
*मालेगांव,(कार्यालयीन प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-* विविध प्रश्नांबाबत ग्रामपंचायत कौळाणे (निं) आणि व-हाणे ग्रामपंचायतीची चौकशी आजपासून सुरु करण्यात आली आहे.
कौळाणे ग्रामपंचायतीने पत्रकार भवनच्या नावाखाली केलेली फसवणूक व गावातील विकास कामात केलेला गोंधळ या प्रकरणाची सखोल चौकशी आजपासून मालेगांव पंचायत समितीचे विस्तारअधिकारी (ग्रामपंचायत विभाग) श्री.राजबन्शी साहेब यांनी सुरु केलेली आहे.या चौकशीवेळी कौळाणेतील तत्कालीन ग्रामसेवक संजीव घोंगडे हे गैरहजर असल्याचे खात्रीशीररित्या समजते.तर ग्रामसेवक दिनेश जाधव यांच्या उपस्थितीत दप्तर तपासणी करण्यात आली.त्याशिवाय व-हाणे गांवी ग्रामपंचायतीत ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांचीही चौकशी करण्यात येऊन,दप्तर तपासण्यात आले.दरम्यान व-हाणे गांवी झालेल्या विकास कामांची व पत्रकार निवासस्थानप्रश्नी अडवणूक केल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी शुक्रवार दिनांक ९आँक्टोबर २०२०रोजी पुन्हा संयुक्तपणे कौळाणे आणि व-हाणे ग्रामपंचायतीची केली जाणार आहे.
*…तर आमरण उपोषण करणारच!*
दिनांक १०आँक्टोबर २०२० पर्यत आपणास दोघांही ग्रामपंचायतीचा चौकशी अहवाल मिळाला नाही आणि या प्रकरणात योग्य न्याय न मिळाल्यास सोमवार दिनांक १२आँक्टोबर पासून पंचायत समिती कार्यालयासमोर आपले आमरण उपोषण आंदोलन हे अटळ राहिल असा इशाराही युवा मराठा न्युज परिवाराच्या वतीने मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांनी दिला आहे.
*चौकशी अहवालाचे रहस्य उघड होणे काळाची गरज*
कौळाणे(निं)आणि व-हाणे ग्रामपंचायतीच्या आजपासून सुरु झालेल्या चौकशीचा अहवाल उघड होणे गरजेचे आहे.त्यातून बाहेर येणारे रहस्य हेच ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराचे दर्शन घडवून विकास कामात काय झोल झाला आहे,व अतिक्रमणाधारकांना पाठीशी घालून नियमानुसार जागा मागणी करणाऱ्यांवर अन्याय करुन कशा पध्दतीने फसवणूक केली जात आहे.याचे सत्य जनतेसमोर येणार आहे . *व-हाणेत अनाधिकाराने दिली वाचनालयाला जागा* व-हाणे ता,मालेगांव या गांवी एका सार्वजनिक वाचनालयाला शासनाच्या कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अधिकृत पत्र नसताना अनधिकाराने जागा देऊन त्या वाचनालयास नमून नंबर ८चा उतारा बहाल करण्यात आला.तर नियमानुसार कागदपत्रांची पुर्तता करुनही पत्रकार निवासस्थानाच्या जागेप्रश्नी आडमुठे धोरण घेऊन अडवणूक करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाचे यामागील नेमके गौडबंगाल काय?याचीही चौकशी होणे अगत्याचे ठरते.त्याशिवाय व-हाणे गावात झालेल्या अतिक्रमणधारकांना पाठीशी घालायचे त्यांचेबाबतीत “ब्र” शब्दही उच्चारायचा नाही,आणि नियमानुसार कामे करणाऱ्याना वेठीस धरायचे हा ग्रामपंचायतीचा अजब कारभार बहुतेक महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत असावा अशीही शंका यानिमिताने उपस्थित होत आहे. *कौळाणे गावाला अतिक्रमणाचा विळखा अन शासकीय मालमतेचे नुकसान* तसाच काहीसा प्रकार कौळाणे (निं)गावात घडत आहे.संपूर्ण गावाला अतिक्रमणाचा विळखा पडला असून,गावात सार्वजनिक मुता-या, शौचालये तोडून तेथे अतिक्रमणधारकांनी आलिशान घरे बांधून घेतलीत.तरीही गेंडयाची कातडी पांघरलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाला त्याचे गांभिर्य कळू नये,इतके डोळ्यांवर झापड ओढून आलबेल कारभार सुरू आहे. *उद्या लाक्षणिक उपोषणात घेणार सहभाग* कौळाणे (निं) आणि व-हाणे ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराबाबत आवाज उठविण्यासाठी व दोषीवर गुन्हे दाखल करुन न्याय मागण्याच्या मागणीसाठी उद्या दिनांक ८आँक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता युवा मराठा न्युजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत हे भारतीय मिडीया फाऊंडेशनने आयोजीत केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण आंदोलनात सहभाग घेऊन याप्रश्नी कौळाणे व-हाणे ग्रामपंचायतीच्या कारभाराचा पर्दाफाश करणार आहेत.अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांना यापुर्वीच निवेदन देण्यात आले आहे,
Home Breaking News *कौळाणे,व-हाणेत ग्रामपंचायत चौकशीला आजपासून सुरुवात* *चौकशीत निष्पन्न होणार दडलेले रहस्य*