Home नाशिक “स्वातंत्र्यांचा ७५,वा अमृत महोत्सव, वर्ष र्निमित्त वन विभाग व, महाविद्याल यांच्या संयुक्त,विदयामांनाने...

“स्वातंत्र्यांचा ७५,वा अमृत महोत्सव, वर्ष र्निमित्त वन विभाग व, महाविद्याल यांच्या संयुक्त,विदयामांनाने विविध कार्यक्रमांचे आयोजन”

56
0

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0051.jpg

“स्वातंत्र्यांचा ७५,वा अमृत महोत्सव, वर्ष र्निमित्त वन विभाग व, महाविद्याल यांच्या संयुक्त,विदयामांनाने विविध कार्यक्रमांचे आयोजन”
नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे                           आज १३ ऑगस्ट रोजी म. प्र. वी समाजाचे, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संस्मरणीय बनवा यासाठी महाविद्यालयात हर घर घर तिरंगा रॅली आयोजित केली होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग विद्यार्थी विकास मंडळ, आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा जागर, तसेच हर घर तिरंगा या योजने अंतर्गत आपणास प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरामध्ये तिरंगा फडकवायचा आहे, या उपक्रमांतर्गत ही रॅली महाविद्यालयचा कॉलेज गेट पासून ते रेल्वे स्टेशन गेट पर्यंत दुपारी १२ ते १ वाजता पार पडली. सदर कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी केंद्रित कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थी सहभागी व्हावा यादृष्टीने प्रयत्न करण्यात आले.
या सर्व उपक्रमांचा आढावा विशद करतांना महाविद्यालयाचे सर.उप. प्राचार्य डॉ. एस ,ए ,मराठे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव का साजरा केला जात आहे. यावर प्रकाश टाकला. ‘तिरंगा’ आपल्या देशाचा अभिमान व सन्मान आहे. आपला राष्ट्रध्वज आपल्यासाठी धैर्याचे व प्रेरणेचे प्रतीक आहे. तिरंगा आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘हर घर तिरंगा ही मोहिम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम प्रत्येक भारतीयाने त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकविण्याची प्रेरणा देते. लोकांच्या हृदयात देशभक्ति जागृत करणे, आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढविणे हा ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या आयोजनामध्ये स्वातंत्र्य लढयाची भावना व त्याग अनुभवता येणार आहे. देशातील सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली व अभिवादन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. अशे सर्व उपक्रम आपल्याला प्रेरणादायी ठरणार आहेत. तरी सर्व पालक, विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी व समाजातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन हे कॉलेजचे उपप्राचार्य माननीय आर, के देवरे व सर्व प्राध्यापक वर्ग, तसेच, वन परीक्षेत्र, अधिकारी सी डी कासार,वन पाल तान्हाजी,भुजबऴ,सुनिल महाले,मगन राठोड़,दिपक वडगे, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ.अतुल मदने आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अधिकारी मोरे यांनी परिश्रम घेतले.

Previous articleयेत्या २६ जानेवारीला कैंसर हॉस्पिटलचे उदघाटन करणार : मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
Next articleघरकुलासाठी उपोषणाला बसणाऱ्या लाभार्थ्यांना बिडिओच्या लेखी पत्राने स्थगिती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here