Home बुलढाणा घरकुलासाठी उपोषणाला बसणाऱ्या लाभार्थ्यांना बिडिओच्या लेखी पत्राने स्थगिती

घरकुलासाठी उपोषणाला बसणाऱ्या लाभार्थ्यांना बिडिओच्या लेखी पत्राने स्थगिती

65
0

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0056.jpg

घरकुलासाठी उपोषणाला बसणाऱ्या लाभार्थ्यांना बिडिओच्या लेखी पत्राने
स्थगिती

युवा मराठा न्युज वेब पोर्टल प्रतिनिधी रवि शिरस्कार, संग्रामपूर..

संग्रामपूर तालुक्यातील एकलारा येथील लाभार्थ्यांनी तसेच नागरिकांनी ग्रामपंचायत एकलारा कार्यालयासमोर 14 ऑगस्ट रोजी प्रपत्र ड च्या घरकुल मंजूर असून सुद्धा लाभार्थ्यांना वंचित ठेवले होते त्यामुळे पंचायत समिती संग्रामपूर यांना निवेदन देऊन 14 तारखेपर्यंत पुरवणी यादी तसेच प्रपत्र ड लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर न केल्यास उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने पंचायत समिती संग्रामपूर गट विकास अधिकारी पाटील यांनी लेखी पत्र देऊन उपोषण मांगे घेण्यासाठी विनंती केली त्यामुळे उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला लेखी पत्र मध्ये ग्रामपंचायत एकलारा येथील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रपत्र ड चे घरकुल प्रस्ताव सादर करणेबाबत ग्रामपंचायतला सूचना देण्यात आलेल्या असून त्यानुसार ग्रामपंचायतीने 15 लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंचायत समिती संग्रामपूर यांच्याकडे सादर केले आहेत उर्वरित प्रस्ताव घेणे सुरू आहे तसेच प्रपत्र ड सर्वे मधून सुटलेले व तांत्रिक अडचणीमुळे सवै न झालेल्या लाभार्थ्यांची यादी जिल्हा परिषदेस पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आलेली आहे अशा स्वरूपाचे लेखी पत्र गट विकास अधिकारी यांनी दिले त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले यावेळी गटविकास अधिकारी पाटील यांनी लेखी स्वरूपाचे पत्र दिले बळीराम धुळे सुनील आस्वार विवेक राऊत श्रीकृष्ण पवार यांच्यासह विस्तार अधिकारी भिलावेकर ग्रामसेवक बोडखे व गावातील काही नागरिक उपस्थित होते

आम्ही 14 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करणार होतो परंतु गट विकास अधिकारी यांनी आमच्या मागण्या मान्य करून लेखी स्वरूपाचे पत्र दिले त्यामुळे आम्ही उपोषण मागे घेत आहोत अशी माहिती एकलारा बा.येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील आस्वार तसेच पत्रकार विवेक राऊत यांनी दिली….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here