Home पुणे भोसरी पोलीस स्टेशन व संजय नाना काटे युवा मंच यांच्या वतीने दापोडी...

भोसरी पोलीस स्टेशन व संजय नाना काटे युवा मंच यांच्या वतीने दापोडी मध्ये हर घर तिरंगा चे आयोजन करण्यात आले

70
0

आशाताई बच्छाव

IMG-20220810-WA0018.jpg

भोसरी पोलीस स्टेशन व संजय नाना काटे युवा मंच यांच्या वतीने दापोडी मध्ये हर घर तिरंगा चे आयोजन करण्यात आले
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
नाते जिव्हाळ्याचे.. कार्य समृद्धीचे ..
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात , स्वतंत्र संग्रामातील अज्ञात नायक / क्रांतिकारक / स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यलढ्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दि. १३ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीसाठी “हर घर तिरंगा” उपक्रम. सुरुवात करण्यात आली यावेळी हुतात्मा भगतसिंग हुतात्मा नारायण दाभाडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार संजय नाना काटे व भास्कर जाधव यांच्या हस्ते पुतळ्यास घालण्यात आला व नंतर कार्यक्रमाची सुरुवात हुतात्म्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात आला यावेळी दापोडी मध्ये माजी नगरसेवक संजय नाना काटे भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव पीएसआय बालाजी झोनापल्ले आरोग्य निरीक्षक सुनील चव्हाण पिंपरी चिंचवड महानगरपालिका सांगवी दवाखाना वैद्यकीय अधिकारी दापोडी पोस्ट ऑफिस चे तुकाराम काटे पत्रकार व सरस्वती आनंदाश्रमातील मुले स्वामी विवेकानंद शाळेतील शिक्षक तसेच दापोडीतील विविध सामाजिक संस्था मंडळ यांच्या हस्ते भाजीपाला विक्रेतांना छत्री व तिरंगा झेंडा देऊन हर घर तिरंगा या उपक्रमाची सुरुवात दापोडी मध्ये या मान्यवरांच्या हस्ते 775 तिरंगा झेंडा व हातगाडी वाल्यांना ऊन व पावसा पासून संरक्षण होण्यासाठी छत्रीचे वाटप करण्यात यावेळी माजी नगरसेवक संजय नाना काटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रत्येकाने झेंड्याचे महत्त्व समजून घेणे खूप गरजेचे आहे तीन रंगांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे महत्व सांगितले आहे त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशाबद्दल प्रेम निर्माण व्हावे व नेहमीच प्रजासत्ता व स्वातंत्र्य दिन हा वेगवेगळ्या प्रकारे साजरा करून हा एक आपला सण आहे व ज्याप्रमाणे आपण आपल्या प्रत्येक धर्माचे सण जसे साजरे करतो तसेच हे दोन्ही सण सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आनंदाने साजरे करावी असे मनोगत संजय नाना काटे यांनी व्यक्त केले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी चंद्रकांत काटे विलास अण्णा काटे विजय शिंदे राजेंद्र काटे सनी खंडागळे विराज काटे सिकंदर सूर्यवंशी रवींद्र कांबळे सुरेश वाघमोडे अलका बोरकर निलेश मते गणेश काटे नंदू काची आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत बाराते तर आभार जयसिंग काटे यांनी मांडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here