Home गडचिरोली विश्व आदिवासी दिवस हा आदिवासी समाजासाठी गौरव दिन आमदार डॉ देवरावजी होळी

विश्व आदिवासी दिवस हा आदिवासी समाजासाठी गौरव दिन आमदार डॉ देवरावजी होळी

45
0

आशाताई बच्छाव

IMG-20220809-WA0075.jpg

विश्व आदिवासी दिवस हा आदिवासी समाजासाठी गौरव दिन

आमदार डॉ देवरावजी होळी                                   गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणातून आपला विकास साधावा

चामोर्शी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा

काल ९ ऑगस्ट हा संपूर्ण जगामध्ये जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येत असून ही बाब आपल्या आदिवासी समाजासाठी अत्यंत गौरवाची बाब असून हा आपल्या समाजासाठी गौरव दिन असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आदिवासी एम्पलॉइज फेडरेशन तालुका चामोर्शी पारंपारिक ग्रामसभा तालुका चामोर्शी जय सेवा महिला बचत गट व महाराणी दुर्गावती महिला शाखा चामोर्शीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक आदिवासी दिनानिमित्त केले

या जागतीक आदिवासी दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार डॉक्टर देवरावजी होळी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जोगेश्वरजी मरसकोल्हे तर सह उद्घाटक म्हणून नगरसेविका वंदनाताई गेडाम ह्या मंचावर प्रामुख्याने उपस्थित होत्या

यावेळी बोलताना आमदार डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले की आज संपूर्ण आदिवासी समाजाचा जगामध्ये गौरव करण्यात येत आहे. भारताच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदावर आदिवासी समाजाच्या श्रीमती द्रौपदी मुर्मु यांची निवड झाल्याने संपूर्ण जगामध्ये आदिवासी समाजाला एक मानाचे स्थान मिळाले आहे. आपल्या आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपला विकास घडवून आणावा असेही त्यांनी याप्रसंगी म्हटले यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा या संयुक्त समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला . तसेच आमदार महोदयांच्या हस्ते उपस्थित गुणवंत विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आदिवासी समाजासह इतर समाजातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here