Home गडचिरोली धुंडेशिवनी येथील निकुरे कुटुंबाला शिवसेनेने दिला आधार… !

धुंडेशिवनी येथील निकुरे कुटुंबाला शिवसेनेने दिला आधार… !

61
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20220809-WA0018.jpg

धुंडेशिवनी येथील निकुरे कुटुंबाला शिवसेनेने दिला आधार… !

गडचिरोली – ( सुरज गुंडमवार ब्युरो चिफ युवा मराठा  न्युज 

वाघ्रबळीची घटना….. शिवसेना सहसपंर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी दिली आर्थिक मदत

गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा परिसरात नरभक्षक वाघाने धुमाकुळ घातला असून वनविभागाने नरभक्षक वाघाचा बंदोबस्त न केल्याने वाघ्रबळीच्या घटनात वाढ होत आहे. धुंडेशिवनी येथील शेतकरी खुशाल निकुरे हे घरची जनावरे चराईसाठी गावाजवळील जंगलपरिसरात गेले असता जंगलात दबा धरून बसलेल्या नरभक्षक वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केल्याची २८ जुलै रोजी घटना घडली. या घटनेमुळे निकुरे कुटंबियावर आघात कोसळला.शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी धुंडशिवनी येथे येथे जाऊन निकुरे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक म्हणून जनसेवेचा वसा जोपासून निकुरे कुटुंबाला आर्थिक मदत दिली.अमिर्झा परिसरात गेल्या वर्षभरापासून नरभक्षक वाघाचे वास्तव्य आहे या नरभ़क्षक वाघाने मागील वर्षभरात अनेक महिला नागरिकांचा बळी घेतला आहे. वाघाने दिभना गावातील तर तब्बल चौघांचा बळी घेतला आहेण् वाघ्रबळीच्या घटना वारंवार घडत असतांनाही वनविभागाने त्या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त केलेला नाहीण् धंुडेशिवनी येथील शेतकरी खुशाल निकुरे हे 28 जुलै रोजी गावातील तीन चार इसमांसह घरची गुरे चारण्यासाठी गावालतगत असलेल्या पिपरी जंगल परिसरात गेले होते. जनावरे चारत असतांना अचानक जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने निकुरे यांच्यावर हल्ला करून ठार केले.घटनेची माहिती शिवसैनिकांनी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांना दिली.जनसेवेच्या कार्यात सदैव अग्रेसर असलेले कात्रटवार यांनी शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण यानुसार सामाजिक बांधीलकी जोपासत वाघाचा बळी ठरलेल्या खुशाल निकुरे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली. तसेच शासनाकडून देण्यात येणारी आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी यावेळी दिले.वाघाच्या घटेनमुळे अमिर्झा परिसरातील अनेक गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून याचा परिणाम शेतीकामावर झाला आहे.गावाजवळील जंगलपरिसरात घरची जनावरे चराईसाठी नेल्यानंतर वाघाच्या हल्याच्या घटना वाढत आहे. त्यामुळे जनावरे कुठे चारावी व त्यांचे संगोपण कसे करावे, त्याचबरोबर शेतीची मशागत न केल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.अमिर्झा परिसरातील वाघ्रबळीच्या घटनांबाबत शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी नुकतेच गडचिरोली दौऱ्यावर आलेले राज्याचे विरोधी पक्ष नेते अजीतदादा पवार साहेब यांची भेट घेऊन लक्ष वेधले होते. वनविभागाने नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी वनविभागाला दिला आहे.वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या निकुरे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देतांना शिवसेना सहसंपर्कप्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार,उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे,नवनाथ ऊके,संदीप अलबनकर,प्रशांत ठाकुर,संदीप भुरसे,मुकेश गुरनुले,सूरज उइके,अमित बानबले,आनंदराव चुधरी,दिलीप चनेकर,ईश्वर लाजुरकर, रूपेश हतबले, स्वप्निल मोडक़र, तुषार बोरकर,अष्पक सय्यद,रूपेश सिडाम, तुषार मशाखेत्री,मोहन आड़े,रविन्द्र जेंगथे, प्रमोद कोकोडे,महेश भोयर, विकास उन्दिरवाडे, जयकुमार खेडेकर,कुशन ठवले,क्षत्रपति भैसरे,कवडू धंधरे,विट्ठल मंदिकर,अमोल मड़ावी,कृष्णा बावने,दीपक सेलोट, राहुल सोरते,अरुण बारापात्रे,बंटी वलादे,राजू जवाड़े, घनशाम उइके,प्रशांत शेडमाके,मधुकर बावने,सूरज टेकाम,सचिन सेलोट, किशोर देशमुख हरबाजी दजगये,कैलास भुरसे,ईश्वर लाजुरकर,त्रयम्बक फुलझेले,खुशल चुधरी,संदीप टेम्भूर्ण, वासुदेव दोम्बले,नानजी रंडीये,पूंजीराम चुधरी,भगवान चनेकर,राहुल खेवले, तानाबा दजगये,अभिषेख कुकडे,अमर मड़ावी,अभाजी लोनबले,यांच्यासह शिवसैनिक व धुंडेशिवनी येथील नागरिक उपस्थित होते.

Previous articleआखिल भारतीय छावा संघटनेची आढावा बैठक संपन्न
Next articleघरोघरी तिरंगा हा कार्यक्रम फक्त भाजपचाच नसुन भारत देशावर प्रेम करणाऱ्या संपूर्ण नागरिकांचा आहे. –खासदार अशोक नेते
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here