आशाताई बच्छाव
पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: आई-वडिलांकडून पोटच्या मुलीची हत्या पूर्ण नागपूर हादरला! अंधश्रद्धेच्या नावाखाली भूत बाबाने तुमच्या मुलीला भूतबाधा झाली आहे असे सांगून तिला बेल्ट ने मारावे लागेल असे सांगितले. तेव्हा तिच्यावरील भूत नाहीस होईल. आई-वडिलांकडून त्या सहा६ वर्षाच्या मुलीला बेल्टने मारहाण झाली. मारहाण एवढी भयानक होती की ,ती मुलगी मारहाण सहन न करू शकल्याने बेशुद्ध पडली. त्यानंतर आई वडील घाबरले व त्यांनी त्वरित त्या मुलीला दवाखान्यामध्ये नेण्याचा प्रयत्न केला परंतु दवाखान्यांमध्ये जाण्यापूर्वीच त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या सर्व घटनेबद्दल पोलिसांनी मुलीच्या आई वडील व मावशी यांना अटक केली आहे. तुमच्या मुलीला भूतबाधा झाली, असे ज्या बाबांनी सांगितले त्या भूत बाबांचा शोध सुरू आहे