Home नाशिक ताहाराबाद येथे शिष्यवृत्ती परीक्षा 2021 व 22 या वर्षासाठी संपन्न.

ताहाराबाद येथे शिष्यवृत्ती परीक्षा 2021 व 22 या वर्षासाठी संपन्न.

42
0

आशाताई बच्छाव

IMG-20220731-WA0022.jpg

ताहाराबाद येथे शिष्यवृत्ती परीक्षा 2021 व 22 या वर्षासाठी संपन्न.
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे.
माध्यमिक शाळांत परीक्षा महामंडळ यांच्या आदेशांवर 2021 व 22 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा ताहाराबाद येथे विविध दोन केंद्रावर घेण्यात आली.
कोरोना या महामारीच्या काळात प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती परीक्षा काही कारणास्तव स्थगित करण्यात आली होती. परंतु आता या परीक्षा घेण्याचा‌ निर्णय परीक्षा मंडळांनी घेतल्याने इयत्ता पाचवी व आठवी या विद्यार्थ्यांसाठी ताहाराबाद येथे ही परीक्षा घेण्यात आली. न्यू इंग्लिश स्कूल ताहाराबाद येथे इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा संपन्न झाली. या केंद्रात सदर 218 विद्यार्थी सहभागी झाले. परीक्षा वर्ग 10 इतकी होती. या परीक्षा काळात 11 परीक्षक काम बघत होते. या परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक म्हणून वसंत सोनवणे काम बघत होते. तसेच ज्ञानदेव सावित्रीबाई फुले विद्यालयात इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यात आली या परीक्षा केंद्रात साधारण २०९ विद्यार्थी सहभाग घेतला. या विद्यालयात एकूण वर्ग खोली संख्या ९ होती यात परीक्षक म्हणून 10 शिक्षक नियुक्त होते. या केंद्रात केंद्र संचालक म्हणून सतीश मोरे काम पहात होते.या केंद्रात आठ इतरत्र विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक हर्षल पाटील यांनी आपले कर्तव्य बजावले . या परीक्षा काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी किंवा विद्यालयात कुठल्याही प्रकारचे कॉफी प्रकार चालणार नाही यासाठी जायखेडा पोलीस स्टेशनच्या पारधी साहेब व रसाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. या बंदोबस्तासाठी न्यू इंग्लिश स्कूल ताहाराबाद साठी पोलीस हवालदार भगत व ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले विद्यालयात पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पवार यांनी आपले कर्तव्य बजावले.

Previous articleनांदगाव तालुक्यात मनसेचा झंझावात सुरूच मोठ्या संख्येने युवकांनी केला मनसे त जाहीर प्रवेश,।       
Next articleविराणे पोहाणेत सट्टाकिंग “एकनाथचा” धुमाकूळ जनता त्रस्त;पोलिस प्रशासन सुस्त!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here