• Home
  • नांदेड जिल्ह्यातील खरीप हंगाम सन 2020- 21 साठी तुर खरेदी मार्केटिंग फेडरेशन मार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू..

नांदेड जिल्ह्यातील खरीप हंगाम सन 2020- 21 साठी तुर खरेदी मार्केटिंग फेडरेशन मार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201228-WA0148.jpg

नांदेड जिल्ह्यातील खरीप हंगाम सन 2020- 21 साठी तुर खरेदी मार्केटिंग फेडरेशन मार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू..

मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड दिनांक 28 डिसेंबर 2020 जिल्ह्यातील किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हंगाम 2020 21 साठी हमीभावाने तुर खरेदी करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशन मार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणी आजपासून सुरू करण्यात आलेली आहे. शेतकर्‍यांनी खरेदी केंद्रावर जाऊन आपली नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी केली आहे. जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020 21 साठी नांदेड (अर्धापूर) मुखेड हदगाव किनवट बिलोली (कासराळी) देगलूर कंधार व लोहा मार्केटिंग फेडरेशन मार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणी आज पासून सुरू करण्यात आली आहे. या खरीप हंगामात तुरीचा हमीभाव प्रतिक्विंटल सहा हजार रुपये आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी चालू हंगामातील तुर या पिकाचा ऑनलाईन पीक पेरा नोंद असलेला सातबाराचा उतारा आधार कार्ड व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक प्र त आदी कागदपत्रे तालुक्यातील खरेदी केंद्रावर देऊन शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन पण अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.

anews Banner

Leave A Comment