• Home
  • *कौळाणेत ग्रामस्थांकडून भुमिपुत्रांचा सत्कार सोहळा समारंभ संपन्न*

*कौळाणेत ग्रामस्थांकडून भुमिपुत्रांचा सत्कार सोहळा समारंभ संपन्न*

*मालेगांव,(युवा मराठा न्युज नेटवर्क)- नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात असलेल्या कौळाणे (निं) गांवी आज विविध क्षेत्रात नावलौकिक गाजविणा-या भुमिपुत्रांचा ग्रामस्थांकडून सत्कार व सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव (धुळे),बारा बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष बंडू काका बच्छाव, माजी जि. प.सदस्य शांताराम देसाई ,पं.स.सदस्य गणेश खैरनार हे उपस्थित होते. कौळाणे गावातील सैन्यदलात असलेल्या जवानांचा यावेळी सत्कार करण्यात आला.सैन्यदलातून सेवानिवृत झालेले शिवराम बच्छाव,सोमनाथ शिंदे,श्रावण बच्छाव,गोविंदा बच्छाव,सुयोग खैरनार,कैलास बच्छाव,विजय बच्छाव,पोलिस कर्मचारी नंदू नामदेव चव्हाण,सागर शेवाळे,दिनेश बच्छाव, युवा मराठा न्युजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत,आरोग्य कर्मचारी डाँ,पुजा शेवाळे,श्रीमती प्रियंका खैरनार पारिचारीका,दिगंबर जोशी मलेरिया डाँक्टर,आशा अहिरे ,नंदा पानपाटील आशावर्कर,कैलास खैरनार ग्रामपंचायत कर्मचारी आदींचा यावेळी कौळाणे ग्रामस्थांकडून शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.तर अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शेवटी बंडू काका बच्छाव यांच्या भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रशांत कुलकर्णी यांनी केले.

anews Banner

Leave A Comment