• Home
  • 🛑 *पुण्यातील ‘या’ भागात सहा दिवस लॉकडाऊन ; घरोघरी जाऊन होणार तपासणी* 🛑

🛑 *पुण्यातील ‘या’ भागात सहा दिवस लॉकडाऊन ; घरोघरी जाऊन होणार तपासणी* 🛑

🛑 *पुण्यातील ‘या’ भागात सहा दिवस लॉकडाऊन ; घरोघरी जाऊन होणार तपासणी* 🛑
✍️ पुणे:( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी मंचर शहर पुढील सहा दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच घरोघरी जाऊन नागरीकांची तपासणी केली जाणार आहे.मंचर शहरात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने मंचर शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनलं आहे.

हे थांबवण्यासाठी मंचर शहर 5 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. तसेच साठ वर्षाच्या पुढील, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि इतर गंभीर अजार असलेल्या नागरिकांची त्यांच्या घरी जाऊन तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी दिली आहे.

आज सकाळी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ही बैठक मंचर ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, तसेच मंचर ग्रामपंचायतीमधील सदस्यही उपस्थित होते….⭕

anews Banner

Leave A Comment