• Home
  • 🛑 मुंबईत असुरक्षित वाटतंय…! तर मुंबई आणि महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही -: गृहमंत्री अनिल देशमुख 🛑

🛑 मुंबईत असुरक्षित वाटतंय…! तर मुंबई आणि महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही -: गृहमंत्री अनिल देशमुख 🛑

🛑 मुंबईत असुरक्षित वाटतंय…! तर मुंबई आणि महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही -: गृहमंत्री अनिल देशमुख 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ एखाद्याला मुंबईत असुरक्षित वाटत असेल तर त्यांना मुंबईत तसंच महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. एखाद्या कलाकाराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हास्यास्पद आहे असंही ते म्हणाले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. पोलिसांच्या हाती मुंबईत सुरक्षित आहे असं अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं.

अलीकडेच कंगना राणावतने मुंबईत सुरक्षित वाटत नाही अशा आशयाचे वक्तव्य केले होते. त्यावर सध्या राज्यात चर्चा असून, कंगना राणावतनेही आपण मुंबईत येत असून, कोण आपल्याला रोखतो तेच पाहतो, असेही एक विधान केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, शिवसेनेने पाठोपाठ मनसेने कंगनाला धमकीवजा इशारा दिला आहे.

मात्र, मी ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा, अशा शब्दात कंगना राणौतने ट्विटरवरुन आव्हान दिले आहे.⭕

anews Banner

Leave A Comment