Home नांदेड तृतीयपंथीय सेजलकडे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र सन्मानाने हस्तांतरीत

तृतीयपंथीय सेजलकडे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र सन्मानाने हस्तांतरीत

94
0

आशाताई बच्छाव

IMG-20220815-WA0123.jpg

तृतीयपंथीय सेजलकडे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र सन्मानाने हस्तांतरीत

· स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक न्याय विभागाचा नवा अध्याय
·जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचा पुढाकार
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका), दि. 15 :- भारतीय राज्यघटनेने तृतीयपंथीय अर्थात किन्नरांना इतरांसारखेच समान अधिकार बहाल केलेले असून त्यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे विविध योजना राबविल्या जातात. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयातच किन्नर सेजल हिला सेतू सुविधा केंद्र आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सन्मानपूर्वक हस्तांतरीत केले. याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते फित कापून प्रस्तावित होते. तथापि डॉ. इटनकर यांनी सेजलला पुढे करून तिच्याच हस्ते या सेतू सुविधा केंद्राचा शुभारंभ करून सामाजिक न्यायाचा नवा अध्याय सुरू केला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, समाज कल्याण आयुक्त तेजस माळवदकर व मान्यवर उपस्थित होते. किन्नरांसाठी असलेल्या सेवाभावी संस्थाचे प्रतिनिधी गोधने, नांदेड जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्यावतीने किन्नरांसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठीही यापूर्वी बैठका घेऊन निर्देश दिलेले आहेत. त्यांच्या स्मशानभूमीचाही प्रश्न आता मार्गी लागला असून यात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी विशेष लक्ष दिले आहे.

Previous articleभारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
Next articleजिल्हाधिकाऱ्यांनी दिली तंबाखू मुक्तीची शपथ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here