Home Breaking News विधानसभा अध्यक्ष नाना पटोले – कोरोणावर मात करू लोकसेवेच्या कार्यासाठी पुन्हा सज्ज

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले – कोरोणावर मात करू लोकसेवेच्या कार्यासाठी पुन्हा सज्ज

111
0

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले – कोरोणावर मात करू लोकसेवेच्या कार्यासाठी पुन्हा सज्ज

मुंबई,दि. १७ – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना आजारावर मात करून नेहमीच्या उत्साहात विधानभवन येथे आपल्या कार्यालयात आले.

दि. ७ व ८ सप्टेंबर, रोजी झालेल्या पावसाळी अधिवेशनाआधी त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे चाचणीमध्ये आढळून आले होते. त्यामुळे त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी स्वत:चे विलगीकरण करून उपचार घेतले. उपचारानंतर त्यांची कोरोना आरटी-पीसीआर चाचणी नकारात्मक (निगेटिव्ह) आल्यावर ते लोकसेवेच्या कार्यासाठी नेहमीच्या जोमाने आणि उत्साहाने पुन्हा सज्ज झाले.

त्यांनी गडचिरोलीतील महाविद्यालयास अनुदान उपलब्ध करून देण्यासंदर्भातील बैठक, विधानभवनातील दैनंदिन कामकाज तसेच मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या. आपण लवकर बरे व्हावे यासाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.

Previous articleबहाद्दरपुरा येथे अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त मास्क व सेनिटायझरचे वाटप
Next article*तिसगांव प्रवेश द्वार ते तिसाई मंदीर रस्त्याचे काम वर्षभर रखडले !*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here