Home नाशिक विराणे पोहाणेत सट्टाकिंग “एकनाथचा” धुमाकूळ जनता त्रस्त;पोलिस प्रशासन सुस्त!

विराणे पोहाणेत सट्टाकिंग “एकनाथचा” धुमाकूळ जनता त्रस्त;पोलिस प्रशासन सुस्त!

52
0

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20220731-154855_Google.jpg

विराणे पोहाणेत सट्टाकिंग “एकनाथचा” धुमाकूळ जनता त्रस्त;पोलिस प्रशासन सुस्त!
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क) मालेगांव- नाशिकच्या काटवन भाग म्हणून प्रसिध्द असलेल्या विराणे,पोहाणे या मालेगांव तालुक्याच्या सरहद्दीवरील गावात सट्टाकिंग एकनाथने आपला धुमाकूळ घातल्याने जनता त्रस्त तर पोलिस प्रशासन सुस्त अशी अवस्था निर्माण झाली आहे. वडनेर खाकुर्डी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या या विराणे व पोहाणे गावात सायने,ता.मालेगांव येथील राहणारा एकनाथ नामक सट्टा माफीया याने आपल्या अवैध सट्टा मटका जुगाराचे बस्तान मांडल्याने या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.तर शेतकऱ्यांना शेतकामासाठी मजुरच मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.त्याशिवाय घरात बायको व पोराबाळांना उपाशीपोटी ठेऊन या भागातला सर्वसामान्य वर्ग जुगाराच्या नादी लागून बरबादीकडे वाटचाल करीत असल्याने या अवैध व बेकायदेशीर सट्टा मटका जुगारावर कठोरात कठोर कारवाई करुन हा अड्डा उध्वस्त करण्याची मागणी अनेकांनी नाव न छापण्याच्या अटीवर युवा मराठा न्युजशी बोलताना केली आहे.

Previous articleताहाराबाद येथे शिष्यवृत्ती परीक्षा 2021 व 22 या वर्षासाठी संपन्न.
Next articleवायसीएम’ रुग्णालयाच्या पाचव्या मजल्याला भीषण आग
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here