Home नागपूर व्‍याघ्र व वन्‍यप्राणी संरक्षणाची घेतली शपथ रोटरी एलिट व एशियाटीक बिगकॅट सोसायटीने...

व्‍याघ्र व वन्‍यप्राणी संरक्षणाची घेतली शपथ रोटरी एलिट व एशियाटीक बिगकॅट सोसायटीने साजरा केला व्‍याघ्र दिन

73
0

आशाताई बच्छाव

IMG-20220730-WA0006.jpg

व्‍याघ्र व वन्‍यप्राणी संरक्षणाची घेतली शपथ

रोटरी एलिट व एशियाटीक बिगकॅट सोसायटीने साजरा केला व्‍याघ्र दिन
नागपूर, (ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)
रोटरी क्‍लब ऑफ नागपूर इलिट आणि एशियाटीक बिग कॅट सोसायटी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आंतरराष्‍ट्रीय व्‍याघ्र दिनानिमित्‍त रॉयल पॉल्‍म्‍स, सेमिनरी हिल्‍स येथे व्‍याघ्र जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमात उपस्‍थ‍ित सर्वांनी व्‍याघ्र व वन्‍यप्राणी संरक्षणाची शपथ घेतली.
कार्यक्रमाला माजी प्रधान मुख्‍य वन संरक्षक प्रकाश ठोसरे, आमदार निलय नाईक, माजी मुख्‍य संरक्षक थापलियाल, एशियाटीक बिग कॅट सोसायटीचे सचिव अजय पाटील, वन अधिकारी किशोर मिश्रीकोटकर, वन अधिकारी कुंदन हाते, रेड्डी, बंटी मुल्‍ला, प्रगती पाटील, रोटरी एलिटचे अध्‍यक्ष शुभंकर पाटील, अक्षित खोसला, शिवांगी गर्ग, कशीश वाणी, करण जोतवानी, अभिषेक कपूर, विवेक अग्रवाल, अल्‍का तायडे, विवेक सिंग, रोटरी एक्‍सचेंजचे परदेशी विद्यार्थी, सोनू खान तसेच, सामाजिक कार्यकर्ते सोनू खान आदींची उपस्‍थ‍िती होती. सुरुवातीला कोरड्या विहीरीत पडलेल्‍या वाघीणीवर आधारित माहितीपट प्रदर्शित करण्‍यात आला. त्‍याबद्दल अधिक माहिती देताना कुंदन हाते म्हणाले, राज्‍यातील व देशातील 2011 साली घडलेली पहिली घटना होती. कोरड्या विहीरीत पडलेल्‍या या वाघीणीला अतिशय शिताफीने बाहेर काढले, तिच्‍यावर उपचार केले गेले आणि परत तिला जंगलात सोडण्‍यात आले. वनविभागाद्वारे त्‍यासाठी केले गेलेले प्रयत्‍न अतिशय कौतूकास्‍पद होते.
निलेश नाईक यांनी निसर्ग व मानवी जीवाच्‍या कल्‍याणासाठी वन्‍यजीवांचे संरक्षण करणे किती गरजेचे आहे यावर भाष्‍य केले. प्रकाश ठोसरे म्‍हणाले, जंगल हा आपल्‍या देशाचा अभिमान आहे. ती आपली भूषणावह परंपरा आहे, तिचे जतन करणे मानवी अस्तित्‍वासाठी अतिशय महत्‍वाचे आहे.
प्रास्‍ताविकातून अजय पाटील यांनी आंतरराष्‍ट्रीय व्‍याघ्र दिनाचे महत्‍त्‍व सांगितले व वाघांचा बचाव करण्‍यासाठी जनजागृती करण्‍याची गरज असल्‍याचे मत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवांगी गर्ग यांनी केले. वाघावर आधारित माहितीपट यावेळी प्रदर्शित करण्‍यात आला.

Previous articleव्‍याघ्र व वन्‍यप्राणी संरक्षणाची घेतली शपथ रोटरी एलिट व एशियाटीक बिगकॅट सोसायटीने साजरा केला व्‍याघ्र दिन
Next articleधैर्यशील मानेंना मतदार धडा शिकवतील= राजू शेट्टी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here