Home नांदेड देगलूर बसस्थानकाचे रखडलेले कामाला पुन्हा एकदा होणार सुरूवात…

देगलूर बसस्थानकाचे रखडलेले कामाला पुन्हा एकदा होणार सुरूवात…

205
0

आशाताई बच्छाव

IMG_20231109_181304.jpg

देगलूर बसस्थानकाचे रखडलेले कामाला पुन्हा एकदा होणार सुरूवात…

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

देगलूर तालुक्यातील जुने बस स्थानक हे तालुक्यातील लहान लहान खेड्यांना जोडण्यासाठी बसेस व खाजगी वाहनांच्या गर्दीचे ठिकाण असून दिवसभर रेलचेल सुरू असते त्यातच अनेक खेड्यातून येणारे मजूर कामगार कर्मचारी व व्यापारी या ठिकाणाहून ये जा करीत असतात परंतु बसस्थानकाच्या पाठीमागे व अवतीभोवती कचरा आणि घाण याची दुर्गंधी येत होती बसस्थानकाची अवस्था बेवारस झाली असून स्थानकामध्ये प्रवासी बसत नसून डुकराचे माहेरघर बनले होते बसस्थानकाचा चेहरा बदलण्यात यावा तसेच दुसऱ्या अनेक समस्या बाबत रुग्णहक्क संघर्ष समितीचे धनाजीराव जोशी यांनी याचा पाठपुरावा करत प्रशासनाला जागी केले धनाजीराव जोशी हे सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी पानंद रस्ते असो निराधाराचे अनुदान रुग्णसेवा अशा अनेक सामाजिक उपक्रमात अग्रेसर असतात परंतु बस स्थानकाचे काम ठेकेदाराने कोविड च्या काळामध्ये थांबविले होते परंतु सदरील ठेकेदाराकडून काम सुरू करण्याची कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे रा.प नियमानुसार सदर ठेकेदारावर कारवाई करण्यात आली आहे तसेच सदर बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम मा. कार्यकारी अभियंता कार्यालय,छत्रपती संभाजीनगर यांचेकडून पुनश्च एकदा निविदा काढण्यात आलेली असून कामास लवकरच सुरुवात होईल असे धनाजीराव जोशी यांनी सदरील कामाबाबत सतत पाठपुरावा करून निविदा काढायला लावून कामाची सुरुवात करून दिली.

Previous articleभाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांनी अश्वमेध पवित्र मंगल शक्तीकलश यांना केले नमन.
Next articleचाळीसगाव तहसील कार्यालयात कुणबीच्या नोंदी शोध मोहीम सुरू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here