Home नांदेड नायगांव नगर पंचायत ची मोठी कार्यवाही १२५ किलो प्लास्टिक व पंधरा हजार...

नायगांव नगर पंचायत ची मोठी कार्यवाही १२५ किलो प्लास्टिक व पंधरा हजार रुपयाचा दंड वसूल 

82
0

आशाताई बच्छाव

IMG-20220723-WA0015.jpg

नायगांव नगर पंचायत ची मोठी कार्यवाही १२५ किलो प्लास्टिक व पंधरा हजार रुपयाचा दंड वसूल

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नायगांव नगरपंचायतच्या विशेष पथकाने बुधवारी दि.२० जुलै २०२२ रोजी मेन रोङवर असलेल्या अनेक प्रतिष्ठानांवर अचानक धाड टाकून जवळपास दोन दुकानातून सव्वा किव्टन प्लास्टिक जप्त करून १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. हि कारवाई नायगांव नगर पंचायतीचे मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर यांच्या पथकाद्वारे करण्यात आली.

शासनाचे प्लास्टिक वापराला सर्वत्र बंदी आहे.असे असतांनाही नायगांव शहरात प्लास्टिक वापर सर्रासपणे सुरू आहे, ही बाब नायगांव नगर पंचायतीचे मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी तातडीने विषेश पथक घेऊन नायगांव नगर पंचायतीच्या हद्दीत असलेल्या जवळपास पस्तीस दुकानांमध्ये अचानक धाड टाकले झाडाझडती घेतली असता यात न्यु साईस्मरण किरणा दुकानात जवळपास १२५ किलो प्लास्टिकच्या वस्तू जप्त करून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तर ज्ञानेश्वर किरणा स्टोअर्स मध्ये ८ किलो प्लास्टिकच्या वस्तू जप्त करून ५ हजार रुपये दंड वसूल करून दोन्ही दुकान मालकांवर प्लास्टिक दंडात्मक कारवाई करून एकूण १२५ किलो प्लास्टिक जप्त करून १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. या विषेश पथकात नगर पंचायतीचे मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर, कार्यालयीन अधीक्षक संतराम. जाधव, कर्मचारी  संभाजी भालेराव,श्रीधर कोलमवार,भिमराव गोवंदे. मुन्ना मगरुळे,शेख मौला ,उमेश कांबळे, बालाजी बोईनवाड, प्रथमेश भालेराव, प्रविण भालेराव, बालाजी चव्हाण .विजय इंगळे.अजय सुर्यवंशी.साहेबराव चिंचोले सह आदीं कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleनियमाच्या काटेकोर अंमलबजावणीसह कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
Next articleबेवारस जीवंत अर्भक आढळले!         
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here