Home कोकण राजापूर तालुक्यातील काजिर्डा जामदा मध्यम प्रकल्प संघर्ष समितीने भुसंपादन व पुनर्वसन संदर्भात...

राजापूर तालुक्यातील काजिर्डा जामदा मध्यम प्रकल्प संघर्ष समितीने भुसंपादन व पुनर्वसन संदर्भात घेतली मा. खासदार विनायक राऊत साहेब यांची भेट..

135
0

राजेंद्र पाटील राऊत

राजापूर तालुक्यातील काजिर्डा जामदा मध्यम प्रकल्प संघर्ष समितीने भुसंपादन व पुनर्वसन संदर्भात घेतली मा. खासदार विनायक राऊत साहेब यांची भेट..

युवा मराठा न्युज नेटवर्क, चँनल l रत्नागिरी I २८ ऑक्टोबर
ब्युरो चिफ – सुनिल अनंत धावडे

राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील जामदा मध्यम प्रकल्प काजिर्डा ता. राजापूर या धरण प्रकल्पाचे काम सन २००४ पासून सुरु झालेले आहे. सदर कामाबाबत प्रकल्पग्रस्त अनेक वेळा मिळणारा भूसंपादनाचा मोबदला, मिळणारे भू-भाडे याबाबत वेळोवेळी गेली १६ वर्षे मागणी करत आहेत. तसेच प्रकल्पग्रस्तांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करणे याबाबतीमध्ये सुध्दा अनेकवेळा पत्र व्यवहार केलेला आहे.
या प्रकल्पासाठी भूसंपादन आणि पुनर्वसनांसाठी करण्यात आलेली तरतूद ही ठेकेदाराच्या बिलापोटी खर्च करण्यात आली आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. खरेतर भूसंपादन व पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्या शिवाय धरणाच्या कामाला सुरुवात करु नये. अशा प्रकारची प्रकल्पग्रस्तांची मागणी होती व आहे. परंतु प्रशासनाला हाताशी धरुन ठेकेदाराने ४०% काम पूर्ण होऊनही अद्याप पर्यत प्रकल्पग्रस्तांचे भूसंपादन व पुनर्वसन झालेले नाही. भूसंपादनाचे आलेले पैसे ठेकेदाराने आपल्या बिलांच्या रक्कमा काढून घेवून सुमारे ७०० कुटुंब प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडण्याचे काम चालू आहे. कोरोनाचे संकट कमी ब-यापैकी कमी झालेले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त आता आक्रमक झाले आहेत. तरी अधिकारी स्तरावर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करावी व आमचा पुनर्वसन व भूसंपादनाचा विषय मार्गी लावावा. अशी विनंती जामदा मध्यम प्रकल्प काजिर्डा संघर्ष समितीने भुसंपादन व पुनर्वसन संदर्भात करण्यात आलेली तरतूद ठेकेदाराच्या बिलापोटी बेकायदेशीर रित्या खर्च केल्याबाबत आज खासदार श्री. विनायक राऊत साहेब यांची राजापूर शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी खासदार विनायक राऊत यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मी पूर्णपणे पाठीशी आहे. दिवाळीनंतर सर्व धरणांची पाहणी करून अधिकाऱ्यांसहित बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे.

Previous articleखेळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना मिळते आंतरराष्ट्रीय कीर्ती                                     
Next articleरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या धन्वंतरी, आदर्श शिक्षक पुरस्कारांचे शानदार वितरण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here