• Home
  • 🛑 एअरटेलची ग्राहकांना भेट, फ्री मध्ये मिळतोय ६जीबी हायस्पीड डेटा 🛑

🛑 एअरटेलची ग्राहकांना भेट, फ्री मध्ये मिळतोय ६जीबी हायस्पीड डेटा 🛑

🛑 एअरटेलची ग्राहकांना भेट, फ्री मध्ये मिळतोय ६जीबी हायस्पीड डेटा 🛑

✍️ ( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई, 2 सप्टेंबर : ⭕ टेलिकॉम कंपनी एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर घेऊन आली आहे. ज्यात युजर्संना ६ जीबी पर्यंत फ्री डेटा दिला जात आहे. कंपनीने जुलै महिन्या ‘फ्री डेटा कूपन’ ऑफरची सुरुवात केली होती. सुरुवातीला या ऑफरमध्ये २१९ रुपये, २४९ रुपये, २७९ रुपये, २९८ रुपये, ३४९ रुपये, ३९८ रुपये, ३९९ रुपये, ४४९ रुपये, ५५८ रुपये, ५९८ रुपये आणि ६९८ रुपयांच्या प्रीपेड प्लान्ससाठी ही ऑफर आणली होती. परंतु, आता या ऑफरमध्ये २९८ रुपये, ४४८ रुपये आणि ५९९ रुपयांच्या प्लानचा समावेश आहे.

➡️ काय आहे फ्री डेटा कूपन :-

फ्री डेटा कूपन अंतर्गत ग्राहकांना १ जीबी डेटाचे काही कूपन फ्री दिले जाते. काही प्लानमध्ये दोन कूपन मिळतात. तर काही प्लानमध्ये ४ आणि ६ कूपन दिले जाते. या प्रमाणे ग्राहकांना जास्तीत जास्त ६ जीबी फ्री डेटाचा वापर करता येवू शकतो.

ज्याच्यासोबत दोन कूपन मिळतात त्यात २१९ रुपये, २४९ रुपये, २७९ रुपये, ३४९ रुपये, ३९८ रुपये, ४४८ रुपयांच्या प्रीपेड प्लानचा समावेश आहे. प्रत्येक कूपनची वैधता ही २८ दिवसांची आहे. ३९९ रुपये, ४४९ रुपये आणि ५५८ रुपयांच्या प्लानसोबत १ जीबी डेटाचे ४ कूपन दिले जाते. तसेच प्रत्येक कूपनची वैधता ५६ दिवसांची आहे. तसेच ५९८ रुपये आणि ६९८ रुपयांच्या प्लानसोबत ६ कूपन मिळतील. याची वैधता ८४-८४ दिवसांची आहे.

४४८ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० एसएमएस आणि रोज ३ जीबी डेटा दिला जातो. यात २८ दिवसांची वैधता मिळते. तसेच ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस सोबत रोज २ जीबी डेटा मिळतो. याची वैधता ५६ दिवसांची आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या दोन्ही प्लानमध्ये Disney+ Hotstar सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते.⭕

anews Banner

Leave A Comment